ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अक्रोड हे आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी ड्रायफ्रूट आहे.
नियमित अक्रोड खाल्याने आपल्या शरीराला असंख्य फायदे मिळतात.
अक्रोड हे एक सूपरफूड असून त्यामध्ये अनेक पोषक गुणधर्म असतात.
पण काही नागरिक पाण्यात भिजवून अक्रोड खातात तर काही दुधात. अशा वेळी अधिक फायदेशीर कोणते जाणून घेऊया.
आपल्या शरीरासाठी दोन्ही पद्धतीने भिजवलेले अक्रोड फायदेशीर आहे.
पाण्यात भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन केल्याने आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
याबरोबर भिजवलेले अक्रोड अॅलर्जीपासून आपला बचाव करते.
स्नायू आणि हाडे मजबूत करणाऱ्या व्यक्तींसाठी दुधात भिजवलेले अक्रोड फायदेशीर आहे.
दुधात अक्रोड भिजवून खाल्याने आपल्या शरीराला प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी मिळते.