पंढरपुरात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळला Saam TV
महाराष्ट्र

पंढरपुरात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळला

दोन दिवसापूर्वी बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे.

भारत नागणे

पंढरपूर : कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना झाल्यानंतर त्याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. आज पंढरपुरात ही मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील त्या घटनेचा निषेध करत कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी केली. दोन दिवसापूर्वी बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे.

या घटनेचे बेळगाव सह पश्चिम महाराष्ट्रातील त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आज पंढरपुरात सर्व शिवप्रेमींनी एकत्रित या घटनेचा निषेध केला आहे. जोपर्यंत समाजकंटकांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत कर्नाटकामधील एक ही बस किंवा खाजगी गाडी महाराष्ट्रात येऊ देणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari: ४४ वर्षाच्या श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते फिदा

Maharashtra Rain Live News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

SCROLL FOR NEXT