Kolhapur Young Boy Committed Suicide संभाजी थोरात
महाराष्ट्र

Kolhapur: "चल जिंदगी थोडा और..." Instagramवर स्टेटस ठेवत तरुणाने संपवलं जीवन

Kolhapur Young Boy Ends His Life: मध्यरात्री २ च्या सुमारास या मुलाने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी (स्टेटस) ठेवत आत्महत्या केली आहे.

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर: माणसाच्या आयुष्यात नैराश्याची पातळी अति झाल्यावर तो व्यक्ती अनेकदा टोकाचं पाऊल उचलतो. हे जग त्याला नकोसं होऊन जातं, आणि तो या जगाचा निरोप घेतो. अशीच एक दुर्देवी घटना कोल्हापूरात (Kolhapur) घडली आहे. एका विद्यार्थ्याने स्वतःच्याच हाताने त्याचं जीवन संपवलं (Suicide) आहे. मध्यरात्री २ च्या सुमारास या मुलाने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी (स्टेटस) ठेवत आत्महत्या केली आहे. (Kolhapur Latest News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील दत्तवाडी इथली आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव सिद्धार्थ जाधव असं आहे. सिद्धार्थने मध्यरात्री दोन वाजता मोबाईल स्टेटस ठेवलं होतं आणि पहाटे आत्महत्या केली. त्याच्या इन्स्टाग्राम स्टेटसवरुन तो कसल्यातरी तणावाच असल्याचं दिसंत. त्याने हिंदीमध्ये आपल्या इन्स्टाग्राम स्टेसमध्ये लिहीलं की, 'बस अब अगले मोडपर ही सुकून होगा. चल जिंदगी थोडा और आगे चलते है' असं त्याने स्टेटस ठेवलं होतं.

सिद्धार्थने आत्महत्या का केली असावी हे अद्याप कळलेलं नाही, त्याच्या आत्महत्येचं अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र सिद्धार्थच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवाराला धक्का बसला असून त्यांच्यावर शोककळा पसरली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Winter Wedding Tips: हिवाळ्यात लेहेंगा आणि साडीसह वापरा अशी जॅकेट आणि शाल ... ज्याने येईल ट्रेंडी लुक; थंडीपासूनही होईल बचाव

Saam Exit Poll: शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून काशीराम पावरा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : कसबा पेठमधून कोण निवडून येणार? रविंद्र धंगेकर की हेमंत रासने? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT