महाराष्ट्र

महामार्गावरील लुटेरे पकडले, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सचिन आगरवाल

अहमदनगर : नगर शहरातून अनेक राष्ट्रीय महामार्ग जातात. या मार्गावर नेहमीच चोरीच्या घटना घडतात. वाहनचालकांना लुटले जाते. मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर परप्रांतीय चालकांना धमकावत मालट्रकमधील माल लंपास करणाऱ्या चोरट्यांना श्रीगोंदे पोलिसांनी जेरबंद केले. तसेच त्यांच्याकडील २५ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

परप्रांतीय ट्रकचालक नीलेश चत्तरसिंग लोदी (रा. बधोरिया, जि. शिवपुरी, मध्य प्रदेश) हा कन्नौज (उत्तर प्रदेश) येथून ३० टन मका भरलेला ट्रक (एमपी- ०९ एचएच-९५३२) घेऊन सांगलीकडे जात होता. १४ जुलै रोजी पहाटे दीडच्या सुमारास लोणी व्यंकनाथ येथील रेल्वे गेटच्या पुढे ट्रक अज्ञात चोरट्यांनी अडवला. लोदी यांना धमकावत बळजबरीने बाबुर्डी शिवारात नेले. तसेच मका त्यांनी आणलेल्या ट्रकमध्ये भरून पसार झाले.

लोदी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपासासाठी पोलिस निरीक्षक रामराम ढिकले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक नेमले. पथकाने दौंड, काष्टी, मांडवगण, हंगेवाडी, मढेवडगाव परिसरात चौकशी करत सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर संबंधित ट्रक काष्टीत आढळला. ट्रकमध्ये मक्याचे दाणे आढळल्याने संशय बळावला. त्यानंतर आर्यन शंकर कांबळे (रा. सांगवी, ता. फलटण, जि. सातारा), संजय बबन कोळपे (रा. बोरी, ता. श्रीगोंदे), गणेश श्रीमंत गिरी (रा. श्रीगोंदे कारखाना), भाऊसाहेब गंगाराम पालवे (रा. श्रीगोंदे कारखाना) व आणखी एकास ताब्यात घेतले.

आरोपींनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेला २५ टन मका, गुन्ह्यात वापरलेला ट्रक, असा २५ लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी आर्यन शंकर कांबळे याला सांगली पोलिसांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्याच्यावर यापूर्वी वडगाव निंबाळकर, फलटण पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Chakankar: EVM ची केली पूजा, रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Live Breaking News : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ पर्यंत ५३.४० टक्के मतदान

'Met Gala 2024' मधील Alia Bhatta चं सौंदर्यापाहून अप्सरा आणि मस्तानीही ठरतील फेल

Shweta Tiwari: सुपरबोल्ड श्वेता तिवारी; हॉट अदांनी उडवली झोप!

DC vs RR,IPL 2024: सामन्याआधीच राजस्थानचं टेन्शन वाढलं! दिल्लीच्या या स्टार खेळाडूंचं होणार कमबॅक, पाहा प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT