Parner Crime News SaamTv
महाराष्ट्र

Parner News: धक्कादायक! वाढदिवसाच्या फ्लेक्सवरुन टोळक्याची जबर मारहाण; दोघे गंभीर जखमी

Parner Loni Haveli News: जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी वीस ते पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, प्रतिनिधी...

Parner Latest News: वाढदिवसाच्या फ्लेक्स लावण्यावरुन दोन गटात झालेल्या मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथे ही घटना घडली असून वाढदिवसाच्या निमित्त लावलेल्या पोस्टर वरून झालेल्या मारामारीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेरमध्ये (Parner) फ्लेक्सवरुन दोन गटात भीषण मारामारी झाल्याचे प्रकार समोर आले आहे. पारनेर गावचे नगराध्यक्ष विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेला शुभेच्छांचा फलक फाडल्यानंतर शुभेच्छा देणाऱ्या तरुणांना तसेच त्यांच्या पालकांना लोणी हवेली येथे तलवार,दांडक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. ज्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी संभाजी बाबुराव थोरे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अनिकेत सुभाष शेळके व रोहीत सुनील शेळके,मिठू गोलवड, अक्षय शेळके, समिर शेळके,अनिकेत शेळके, अमोल माळी, साईनाथ राक्षे आणि अनोळखी वीस ते पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले निलेश कोल्हे व विजय थोरे यांच्यावर पारनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावात झालेल्या या मारहाणीमुळे तणावपुर्ण शांतता पाहायला मिळत असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Parner Crime News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT