Aurangabad Crime Saam TV
महाराष्ट्र

धक्कादायक! चौदाशे रुपयांसाठी मित्रांनीच केली मित्राची हत्या

युसुफ हा ११ तारखेपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

लक्ष्मण सोळुंके

औरंगाबाद : तीन मित्रांनी चोरी केलेल्या पाईपच्या पैशाच्या वाटणीवरुन, एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा गळा आवळून खुन केल्याची धक्कादायक घटना, आज औरंगाबाद (Aurangabad) शहरातील जाधववाडी परिसरात घडली आहे. युसुफ खान असे खुन झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून याप्रकरणी जिन्सी पोलीसांनी त्याच्याच दोन मित्रांना अटक केली आहे.

सय्यद आमीर सय्यद सलीम वय वर्ष २१ आणि फिरोज शेख वय वर्ष २७ असं अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. मयत युसुफ खान याच्या वडिलांनी काल जिन्सी पोलीस ठाण्यात (Jinsi Police Station) युसुफ हा ११ तारखेपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिन्सी पोलीसांनी तो अल्पवयीन असल्याने कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला होता.

हे देखील पाहा -

त्यानंतर आज दुपारच्या सुमारास जाधववाडी परिसरात एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानंतर चौकशी अंती हा मृतदेह युसुफचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलीसांनी (Police) मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात (Hospital) पाठवले असून दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास जिन्सी पोलीस करत आहेत. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT