महाराष्ट्र

Flood Of Money: सांगलीत पैशांचा पूर; ओढ्याच्या पाण्यातून 500 रुपयांच्या नोटा आल्या वाहून

Sangali Money Flood : एखाद्या ओढ्याच्या पाण्यातून पैशांच्या नोटा वाहून आल्या तर . ऐकूनच आश्चर्य वाटलं ना? हो पण हे खरं आहे. असं वास्तवात घडलंय. कुठली ही घटना आहे. चला पाहूयात एक रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मतदारांवर 'पैशांचा पाऊस' पाडला जाऊ नये, यासाठी निवडणूक आयोग डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत आहे. मात्र त्याच वेळी सांगली जिल्ह्यात एका ओढ्यामध्ये लाखो रुपयांची रोकड सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्याच्या महागाईच्या जमान्यात पैशांवर कुणाचा जीव नसतो. कधी तेलाचा, धान्याचा किंवा जीवनावश्यक वस्तू असलेले वाहन रस्त्यावर अपघाताने उलटले तरी ते घेण्यासाठी स्थानिक नागरिकांची अक्षरशा झुंबड उडते.

हे आपण अनेकदा पाहिलं असेल..अशीच एक घटना सांगलीच्या आटपाडीत घडली आहे. पण इथं चक्क नोटा वाहून आल्यात आणि त्याही पाचशेच्या...मग काय पैसे घेण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु झाली. अगदी म्हातारे-कोतारेही ओढ्यापाशी जमले

सांगलीच्या आटपाडीत अंबाबाई मंदिर परिसरात गदिमा पार्कच्या समोरून जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून चक्क पाचशे रुपयांच्या नोटा वाहून आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग काय सगळ्यांनी ओढ्याच्या पुलाकडे धाव घेतली. तात्या किती नोटा काढल्या ? अशी विचारणाही सुरु झाली.शनिवारचा बाजार असल्यानं या परीसरात अगोदरच गर्दी होती. पाचशेची नोट मिळाल्यावर ही महिला काय म्हणते पाहा.

आपल्यालाही एक नोट मिळावी म्हणून अनेकजण धडपड करु लागले. ओढ्यातला कचरा बाजुला करु लागले. तर पुलावर बघणारेही जमले होते. पैसा बोलता है म्हणतात. त्यामुळे ज्यांना मिळाले त्यांनी शनिवारचा बाजार भरभरुन केला. ज्यांना नोट मिळाली नाही त्यांचा हिरमोड झाल. दरम्यान या नोटा कोणाच्या आहेत. ओढ्यात कुठून आल्या ? याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT