Beed News Saam TV
महाराष्ट्र

परतीच्या पावसाने सोयाबीनची माती, तरुण शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; ऐन दिवाळीत संसार उध्वस्त

गेल्या आठवड्यात पाच दिवसात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवलं आहे.

विनोद जिरे

बीड : शेतात लावलेलं सोयाबीन परतीच्या पावसाने मातीमोल झालं, तब्बल 2 एक्कर मध्ये सोयाबीनच्या लागवडीसाठी केलेली मशागत बियानाचे पैसे आणि ऐन दिवाळीत जेव्हा सोयाबीन (Soybeans) विकून घेतलेली कर्ज फेडायची वेळ आली त्याच वेळी परतीच्या पावसाने घात केला आण सर्व सोयाबीनचा अक्षरश: डोळ्यासमोर चिखलात गेलं.

त्यामुळे आता घेतलेलं कर्ज कसं भागवायचं ? या विवंचनेतून एका 31 वर्षीय तरुण शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बीडच्या (Beed) केज तालुक्यातील जोला या गावात घडली आहे. तर आमचं 2 एकर सोयाबीन गेलं म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचललं म्हणत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीने एकच टाहो फोडला, त्यामुळे ऐन तरण्याबांड शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला असून संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

पाहा व्हिडीओ -

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश मारोती सारूक वय 31 रा. जोला ता. केज असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. गणेश सारूक यांची 2 एक्कर सोयाबीन पेरली होती. मात्र अतिवृष्टीने पुरतं सोयाबीन वाया गेलं. त्यामुळे सेवा सहकारी सोसायटीसह इतर खाजगी घेतलेलं कर्ज कसं फेडाव ? या नैराश्यातून कर्जबाजारीपणाला कंटाळून गणेश सारूक यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच केज पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्याच्या घटनेत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात पाच दिवसात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले.

मात्र, सरकार आणि निगरगट्ट प्रशासनाने आत्तापर्यंत शेतकऱ्यांना कसलाही आधार दिलेला नाही. या अतिवृष्टीच्या खाईत शेतकरी हतबल झालाय. त्यामुळे या शेतकऱ्यांना धीर आणि आधार देण्याची गरज आज निर्माण झाली आहे. त्यामुळे आता सरकार आणि प्रशासन या शेतकऱ्यांना आधार देणार का ? असा सवाल गावकरी उपस्थित करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT