Dog Shot And Killed In Beed Saam TV
महाराष्ट्र

धक्कादायक! कुत्रा भुंकला म्हणून गोळी घालून केलं ठार; बीडमधील संतापजनक घटनेनं खळबळ

Dog Shot And Killed In Beed: हॉटेलवर आलेल्या रामराज घोळवे, रा. परळी याने कुत्रा भुंकत असल्याच्या कारणावरून त्यास बंदुकीच्या गोळ्या घालून निर्दयीपणे ठार मारलं.

विनोद जिरे

Beed Crime News: बीडच्या परळी तालुक्यात निर्दयीपणाचा कळस गाठल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. कुत्रा भुंकला म्हणून एकाने चक्क त्याच्या जवळील बंदुकीतून कुत्र्यावर गोळीबार (Firing) केला आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेला कुत्रा जागीच ठार झाला आहे. ही घटना बीडच्या परळी-धर्मापुरी मार्गावर असलेल्या एका धाब्यावर घडली आहे. (Beed Latest News)

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परळी-धर्मापुरी (Beed) मार्गावर विकास बनसोडे यांचे हॉटेल आहे. या हॉटेलवर विकास बनसोडे यांचा एक कुत्रा देखील आहे. मात्र हा कुत्रा भुंकला म्हणून हॉटेलवर आलेल्या रामराज घोळवे, रा. परळी याने कुत्रा भुंकत असल्याच्या कारणावरून त्यास बंदुकीच्या गोळ्या घालून निर्दयीपणे ठार मारलं.

याप्रकरणी हॉटेल चालक विकास बनसोडे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन कलम 428,429 भादवी, कलम 25(3) भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Ticket Clerk : प्रवाशांची तिकिटासाठी मोठी रांग, तरीही बुकिंग क्लर्क फोनवर बिझी; संताप आणणारा व्हिडिओ

World Lung Cancer Day 2025: फुफ्फुसाचा कर्करोग झाल्यास सुरूवातीला काय लक्षणं दिसतात? वेळीच व्हा सावध

Konkan Railway: ट्रेनमधून कार कोकणात न्यायचीय? कसं कराल बुकिंग, किती लागेल शुल्क? जाणून घ्या सर्व काही

Income Tax Return: करदात्यांसाठी आनंदाची बातमी! आता आयटीआरचा परतावा काही तासांत येणार

Maharashtra Live News Update: - बदलापूर रेल्वे स्थानकात बसवले जुनेच सरकते जिने

SCROLL FOR NEXT