नाशिकमधील फटाके बंदीवर आज निर्णय होणार; निर्णयावरून गोंधळाची शक्यता... Saam Tv News
महाराष्ट्र

नाशिकमधील फटाके बंदीवर आज निर्णय होणार; निर्णयावरून गोंधळाची शक्यता...

नाशिकमधील फटाके बंदीवर आज निर्णय होणार आहे. महापालिकेच्या महासभेत हा निर्णय होणार असून फटाके बंदीच्या निर्णयावरून महासभेत गोंधळ होण्याची शक्यता आहे.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यांना बंदी घालण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतर आज नाशिक महापालिकेच्या महासभेत नाशिकमधील फटाकेबंदीवर निर्णय होणार आहे. नाशिकमधील फटाकेबंदीला सत्ताधाऱ्यांसह फटाके व्यापाऱ्यांचाही या बंदीला विरोध असल्यानं या निर्णयावरून महासभेत चांगलाच गदारोळ होण्याची शक्यता आहे. (A decision to ban firecrackers in Nashik will be taken today; Possibility of decision dispute)

हे देखील पहा -

ऐनवेळी फटाकेबंदीचा निर्णय झाल्यास व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे, तर नागरिकांचा देखील हिरमोड होण्याची शक्यता आहे. मात्र ऐनवेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या आदेशामुळे महापालिकाही अडचणीत सापडली असून आज महासभेत फटाकेबंदीबाबत काय निर्णय होतो? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वायू प्रदुषण वाढण्यापासून रोखता यावे यासाठी मुंबई महानगर पालिकेने देखील फटाक्यांवर बंदी घातली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

Sleeveless Blouse Pattern: स्लिव्हलेस ब्लाऊजच्या या 5 डिझाईन्स, हटके आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्हीही ट्राय करा

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड

राष्ट्रवादी विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड|VIDEO

Health Care : जास्त प्रमाणात खजूर खाल्याने आरोग्यावर होतात 'हे' 5 गंभीर परिणाम; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT