नुकसान भरपाईचे अर्ज दाखल करण्यासाठी, निलंगा कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

नुकसान भरपाईचे अर्ज दाखल करण्यासाठी, निलंगा कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी!

विमा कंपनीस ऑफलाईन पध्दतीने पूर्वसूचना देण्याची आज 16 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद व मुग या पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऑफलाईन (Offline) पध्दतीने विमा कंपनीकडे (Insurance company) नुकसान भरपाई मिळावी म्हणून निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालयात (Agriculture Office) गर्दी केली होती. या कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते. कार्यालयाकडे जाणारा रस्ताही बंद झाला होता. तसेच या गर्दीने कोरोना संसर्गाचे सर्व नियम धाब्यावर बसविल्याचे चित्र पहायला मिळाले तर विमा कंपनीच्या या कारभाराबद्दल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. (A crowd of farmers at the Nilanga Agriculture Office)

हे देखील पहा-

यंदा दोन टप्यामध्ये पेरणी झाली असली तरी कांही मागील महिन्यात पाऊस नसल्यामुळे पीके संकटात आली होती तर कांही पीके अतिवृष्टीमुळे गेली आहेत. याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून ऑनलाईन (online Complaint ) तक्रार दाखल केली होती. मात्र ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे सरसकट ऑफलाईन पंचनामे करा असे आदेश दिले होते. याबाबत विमा कंपनीकडून ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्सुरनस अॅपवर (App) ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल केली नाही अशा शेतकऱ्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची गरज आहे.

सप्टेंबर मध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीन, मुग, उडिद, ज्वारी पिकाचे नुकसान झाल्याचे विमा कंपनीस ऑफलाईन पध्दतीने पूर्वसूचना देण्याची आज 16 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. यानंतर ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत असे विमा कंपनी ने कळविले होते. त्यामुळे तालुक्यातील गावागावात हा मेसेज व्हाट्स अॅपवर, (Whatsapp Message) दवंडीद्वारे सांगण्यात आला यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

SCROLL FOR NEXT