भंडारा: तीन दिवसांतच कोरोना मुक्त होण्याच्या मान भंडारा जिल्हाने (Bhandara District) गमावला असून लाखनी तालुक्यात परत 1 पॉझिटीव्ह रुग्ण आढल्याने भंडारा जिल्हा कोरोना (Coronavirus Free) युक्त झाला आहे. 6 आगस्ट रोजी भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. मात्र आज 9 ऑगस्ट रोजी परत एक़ पॉझिटिव्ह रुग्ण आढल्याने केवल 3 दिवसाच्या सुखद अनुभवा नंतर भंडारा जिल्हा परत कोरोना युक्त झाला आहे.
1 एप्रिल ला आलेल्यां दुसऱ्या लाटेने जिल्ह्याला अक्षरक्षा हादरुन सोडले असून दुसऱ्या लाटेत तब्बल 41 हजार 432 नागरिक संक्रमित झाले तर दुसऱ्या लाटेत तब्बल 789 लोकांचा बळी गेला आहे. लोकांच्या बळी जाणारी संख्या लक्षात घेता अगोदरच सरण रचुन ठेवन्याची नामुश्कि भंडारा जिल्हा प्रशासनावर आली होती.
मात्र हा संघर्ष करत 6 ऑगस्ट रोजी अखेर भंडारा जिल्हा कोरोना मुक्तझाला होता. त्यांमुळे जिल्ह्यात सर्व सुरळीत होईल व नक्कीच लॉकडाउन शिथिल होईल अशी आशा होती. मात्र सद्धा ती आशा विरल्याचे चित्र उभे झाले आहे. हाती आलेल्यां अहवाला नुसार आज लाखनी तालुक्यात 1 कोरोना रुग आढळला असुन पॉझिटिव्ह रुग्णांची आतापर्यंत संख्या 59 हजार 810 झाली असून 58 हजार 676 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे
तर 1133 लोकांच्या कोरोनाने बळी पडली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे।त्यांमुळे 3 दिवसानन्तर भंडारा जिल्हा परत कोरोना युक्त झाला आहे. त्यांमुळे जिल्हा वासियानी कोरोना मुक्तिसाठी परत वाट पहावी लागणार आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.