सहा वर्षीय चिमुकलीच्या घशात नाणं अडकलं; डॉक्टरांनी विनाशस्त्रक्रिया काढलं... संजय जाधव
महाराष्ट्र

सहा वर्षीय चिमुकलीच्या घशात नाणं अडकलं; डॉक्टरांनी विनाशस्त्रक्रिया काढलं...

कोणतीही शस्त्रक्रिया न करता कैथेटरसारख्या यंत्राचा वापर करत नाणे यशस्वीरीत्या बाहेर काढून डॉ. सचिन सांगळे यांनी चिमुकलीला जीवनदान दिले आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: पालकांचा डोळा चुकवून लहान मुलांचे उपद्व्याप सुरूच असले तरी अनेकदा ही बाब त्यांच्या जीवाशी खेळ ठरण्याची भीती असते. अशीच एक घटना जळगाव जामोद येथे घडली. खेळ खेळताना एका लहानगीने पाच रुपयाचे नाणे तोंडात घातले आणि एका क्षणात ते गिळले. त्यानंतर तिच्या रडण्याच्या आवाजाने पालकांना हा प्रकार कळला आणि त्यांचे धाबे दणाणले. जवळच्या एका खाजगी रुग्णालयात मुलीला दाखविण्यात आले.

तेथे मुलीच्या घशाचे एक्सरे काढण्यात आले. त्यामध्ये पाच रुपयांचे नाणे हे घशात अडकले असल्याचे दिसले. तेथील डॉक्टरांनी तिला शेगावच्या प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल मध्ये हलविले आणि तेथे वेळ न दवडता शेगावच्या डॉ. सचिन सांगळे यांनी कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता हे नाणे यशस्वीरीत्या बाहेर काढून चिमुकलीला जीवनदान दिले. (A five-rupee coin stuck in the throat of a six-year-old girl; without operation doctor withdraw coin out of the throat)

हे देखील पहा -

जळगाव जामोद येथील कु. संगीता दलसिंग गोथरे या मुलीने खेळता खेळता पाच रुपयाचे नाणे गिळल्याचा प्रकार घडला. या प्रकाराने घाबरलेल्या पालकांनी शहरातीलच एका खाजगी डॉक्टरांकडे धाव घेतली. तेथे मुलीच्या घशाचे एक्सरे काढण्यात आले. त्यामध्ये पाच रुपयांचे नाणे हे घशात अडकले असल्याचे दिसले. श्वसननलिका आणि अन्ननलिकेच्या सुरुवातीलाच नाणे अडकल्याचे स्पष्ट झाले. यामुळे अधिक हालचालींमुळे श्वसननलिकेतही नाणे जाण्याची भीती होती. म्हणून तेथील डॉक्टरांनी त्याला शेगावच्या प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल हलविण्याचा सल्ला दिला.

पालकांनी त्याप्रमाणे शेगाव गाठून डॉ. सांगळे यांची भेट घेऊन मुलीला दाखविले. लहान मुलांच्या घश्यात नाणे किंवा कोणतीही वस्तू अडकली कि त्याचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. मात्र पालकांची हलाकीची परिस्थिती पाहता काही डॉक्टर आपला कसब वापरून अश्या मुलांना जीवदान देतात. त्यातीलच डॉक्टर सांगळे हे एक.... या प्रकरणातही त्यांनी तसंच केलं. वेळ न दवडता डॉ. सचिन सांगळे यांनी नाणे काढण्यासाठी कैथेटरसारख्या यंत्राचा वापर केला. तोंडाच्या आतून श्वसननलिकेपर्यंत पोहोचणाऱ्या या कैथेटर ने अलगद नाणे काढण्यात आले.

यंत्र आतमध्ये सरकविणे सोपे असले तरी नाण्यासकट ते बाहेर काढताना अन्ननलिकेलाही धक्का बसण्याची शक्यता होती. मात्र अधिक वेळ दवडल्यास नाण्यामुळे दोन्ही नलिकांमध्ये नाणे अडकण्याची भीती होती. ही प्रक्रिया खासगी रुग्णालयात केली जात असली तरी असा प्रयोग शासकीय रुग्णालयात होत नाही. नाणे यशस्वीरीत्या बाहेर काढून डॉ. सांगळे यांनी चिमुकलीला जीवनदान दिले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT