Gautami Patil Saam Tv
महाराष्ट्र

Gautami Patil : गौतमी पाटील पुन्हा अडचणीत; न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची मागणी

आपल्या डान्समध्ये ती अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप प्रतिभा शेलार यांनी करत तक्रार दाखल केली होती.

Ruchika Jadhav

Gautami Patil : आपल्या दिलखेच अदांनी आणि सौंदर्याने तरुणाईला भूरळ घालणारी गौतमी पाटील आता मोठ्या अडचणीत सापडली आहे. गौतमीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी वकिलाने न्यायालयात केली आहे. गौतमी गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे. आपल्या डान्समध्ये ती अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप प्रतिभा शेलार यांनी करत तक्रार दाखल केली होती. (Latest Gautami Patil News)

यासह गैतमीच्या नृत्यावर अक्षेप घेत मृणाल कुलकर्णी यांनी देखील गौतमी विरोधात साताऱ्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी त्यांनी दु:ख आणि खंत देखील व्यक्त केली होती. कलावंताने आपली मर्यादा राखली पाहिजे. लावणीकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टीकोन फार वेगळा आहे. मात्र जर कोणी अशा पद्धतीने कृत्य करत असेल तर दुर्दैवाने एका कलावंताविरोधात तक्रार दाखल करावी लागते, असं मृणाल यांनी म्हटलं होतं.

गौतमीने कार्यक्रमात केलेला अश्लील डान्स पाहून चहू बाजूने तिच्यावर टीका होत होती. त्यामुळे गौतमीने पुढे स्वत: या बाबद माफी मागितली. मला लावणीची संस्कृती मोडायची नाही. जे झाले त्यासाठी मी सर्वांची माफी मागते, पुन्हा असे होणार नाही, असं गौतमी म्हणाली होती.

अशात माफी मागितल्यानंतर देखील गौतमीने काही वेळ संस्कृती जपली मात्र नंतर पुन्हा एकदा तिच्या कार्य्रमांमध्ये अश्लील हावभाव ती करत आहे, असा आरोप मृणाल यांनी केला. तसेच पुन्हा एकदा या बाबद तक्रार दाखल केली. सध्या गौतमीच्या कार्यक्रमांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यात अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता सातारा कोर्टात गौतमीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मगणी केली गेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

IND vs PAK : पाकिस्तानविरोधात खेळावं की नाही, टीम इंडिया संभ्रमात, गौतम गंभीर म्हणाला...

Beed : जामीनावर सुटताच स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी; बीड शहरातील धक्कादायक प्रकार

Dashavatar Collection : बॉक्स ऑफिसवर 'दशावतार'चा बोलबाला; दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयानं केली जादू, २ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी

गोविंद बर्गे प्रकरणात मोठा ट्विस्ट; माजी उपसरपंचांकडून पूजाला साडेसात लाख रूपयांची भेटवस्तू

SCROLL FOR NEXT