Chandrakant Patil: महापुरुषांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काल शाईफेक करण्यात आली. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडीला. शाईफेक करतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. अशात या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला. शाईफेक होण्याआधीच असे करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रवादीतून ५१ हजारांचे बक्षीस जाहीर झाले होते. या प्रकरणात आता १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा अनेक व्यक्तींनी निषेध केला. तसेच बारामतीच्या सोमोश्वरनगरमध्ये राष्ट्रवादीचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. यात त्यांनी चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला ५१ हजारांचे बक्षीस दिले जाईल असे भाषण केले होते. या चिथावणीखोर भाषणाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.
अशात आता चिथावणीखोर भाषण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एकूण १४ कार्यकर्त्यांवर बारामतीमध्ये (Baramati) गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, शाईफेकीची घटना घडल्यावर विरोधक तसेच सत्ताधाऱ्यांनी हे योग्य नसल्याचे म्हटले होते. यात पाटलांनी सदर हल्ला हा पूर्वनियोजीत होता असा आरोप केला. तसेच त्यांनी रोहित पवारांवर (Rohit Pawar) टीका केली. अशात राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील आपल्या ट्विटर आकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत शाईफेक करणे योग्य नाही. पाटलांनी केलेल्या वक्तव्यास वैचारिक आणि संवैधानिक मार्गाने विरोध करणं गरजेच आहे, असं म्हटलं होतं.
शाईफेक प्रकरणी १ पोलीस निरीक्षक २ दोन उपनिरीक्षक आणि ७ कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निलंबीत केलं आहे. पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर आणि पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, गणेश माने यांच्यासहीत ७ पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबीत केलं आहे. पाटलांनी पोलिसांना निलंबीत करुनये अशी विनंती केली होती. मात्र पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.