Rohit Pawar: राज ठाकरेंची स्टाईल भाजपची स्टाईल झाल्यासारखं वाटू लागलंय; रोहित पवारांचा चिमटा

राज ठाकरे यांची स्वत:ची एक वेगळी स्टाईल आहे, त्यांनी ती तशीच ठेवायला पाहिजे.
रोहित पवारांचे राज ठाकरेंना 'हे' प्रत्युत्तर
रोहित पवारांचे राज ठाकरेंना 'हे' प्रत्युत्तर Saam Tv
Published On

पुणे : राज ठाकरे आणि भाजपची जवळीक हळूहळू वाढू लागली आहे. हाच धागा धरत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. राज ठाकरेंची स्टाईल भाजपची स्टाईल झाल्यासारखं वाटू लागल्याचं रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटलं. राजगुरुनगर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

राज ठाकरे यांची स्वत:ची एक वेगळी स्टाईल आहे, त्यांनी ती तशीच ठेवायला पाहिजे. मात्र मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांची स्टाईल कुठंतरी भाजपाची स्टाईल झाल्यासारखं राज्यातल्या जनतेला वाटतंय, असा चिमटा रोहित पवारांनी राज ठाकरेंना घेतला. (Latest Marathi News)

रोहित पवारांचे राज ठाकरेंना 'हे' प्रत्युत्तर
'डोक्यावरचे गेलेले केस...';रोहित पवारांनी सांगितला कार्यकर्त्याचा किस्सा, कार्यक्रमात एकच हास्यकल्लोळ

राज ठाकरेंची राज गर्जना आज होणार असताना त्यांनी स्वत:ची मतं ठामपणे मांडावी. महाराष्ट्राच्या हिताची मतं त्यांनी मांडवीत. महाराष्ट्राच्या थोर व्यक्ती आणि महाराष्ट्राच्या विचारांचा अवमान झालाय याबद्दल मत व्यक्त करावं, असं आवाहनही रोहित पवारांनी केलं.

रोहित पवारांचे राज ठाकरेंना 'हे' प्रत्युत्तर
Pune MNS : मनसेत अंतर्गत वाद; वसंत मोरे पुन्हा नाराज असल्याची चर्चा, स्वत: सांगितलं कारण...

युवकांना महाराष्ट्र बंदची साद

महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आणि इथं महाराष्ट्राचा वापर इतर राज्यांच्या निवडणुकांसाठी केला जात असल्याचा घणाघात रोहित पवारांनी केला.राज्यातल्या युवकांचे भविष्य घडणाऱ्या नोकऱ्या बाहेरच्या राज्यात जात आहेत. राज्यातला युवकच आपले व्यवसाय बंद ठेवून महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होईल, असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला.

अशाप्रकारे काल उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करत महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, त्या हाकेला रोहित पवारांनी पाठिंबा दिला. राज्यातला रोजगार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इतर राज्यात नेला जातोय. हीच महाराष्ट्राची आस्मिता टिकवण्यासाठी जे जे करावं लागेल ते करणारच, असं म्हणत राज्यातल्या युवकांना महाराष्ट्र बंदची साद घातली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com