Nagpur Latest Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News: आयटी इंजिनिअर तरुणीवर जीम ट्रेनरचा अत्याचार; नागपुरातील संतापजक घटना, आरोपीला अटक

Nagpur News Today: नागपुरात २६ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीवर एका जीम ट्रेनरने लैंगिक अत्याचार आहे.

Satish Daud

Nagpur Latest Crime News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. अत्याचाराला बळी पडलेल्यांमध्ये तरुणींचं प्रमाण सर्वाधिक आहे. लग्नाचे प्रलोभन देऊन प्रेमाच्या जाळ्यात खेचून तरुणींवर अत्याचार केल्याच्या अनेक आजवर उघडकीस आल्या आहेत. अशीच एक घटना नागपूर शहरातील पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शहरातही घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एका जीम ट्रेनरचे २६ वर्षीय तरुणीवर प्रेम जडलं. कालांतराने दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडला, की अनेकदा त्यांनी शरीरसंबंधही ठेवले. मात्र, जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा जीम ट्रेनरने तरुणीला नाकारालं.(Latest Marathi News)

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी (Police) जीम ट्रेनरवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. रोहित पांडे (वय ३२) रा. हुडकेश्वर असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय तरुणीने गुवाहाटी येथून आयटी इंजिनिअरिंग केले. आरोपी रोहित यानेही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले असून दोघेही जीम प्रशिक्षक आहेत. २०१९ मध्ये दोघेही एकाच जिममध्ये व्यायाम करत. नंतर ते प्रशिक्षक बनले. दोघात प्रेम झाले.

रोहितने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याशिवायआपत्तीजनक छायाचित्रणही केले. इतकंच नाही, तर जीम सुरू करण्याच्या नावाखाली पीडितेकडून साडेसहा लाख रुपये देखील उकळले.

तरुणासोबत आपलं लग्न होणार असल्याने पीडितेने मोठ्या विश्वासाने ही रक्कम दिली. काही दिवसांपूर्वी पीडितेने लग्नाचा विषय काढल्यावर आरोपी तरुण टाळाटाळ करू लागला. तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देखील त्याने पीडितेला देण्यास सुरुवात केली.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेने पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नांदगावमधून सुहास कांदे विजयी

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे तिसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

SCROLL FOR NEXT