Nanded Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

नांदेड हादरलं! महिलेचा नको त्या अवस्थेत व्हिडिओ बनवला; त्यानंतर घडलं भयंकर

सचिन मुरलीधर कदम (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे

संतोष जोशी

नांदेड : मार्लेगाव (Nanded) येथील एका २१ वर्षीय तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या (Crime) करण्यात आली होती. या तरुणाचा मृतदेह गुरूवारी बोरगाव शिवारातील एका डोहात आढळून आला होता. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्रे फिरवत तीन संशयित आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. (Nanded Crime News)

सचिन मुरलीधर कदम (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मार्लेगाव येथील सचिन हा गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतात गेला होता. सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही. नातेवाईकांनी शेतात आणि गावात सर्वत्र शोध घेऊनही तो आढळून आला नाही. त्यामुळे गावातील ३० ते ४० तरुणांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तिथेही तो आढळून आला नाही.

यानंतर रात्री १० वाजेच्या दरम्यान नदीकाठावरील बोरगाव शिवारातील डोहात सचिनचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मनाठा पोलिसांना मिळाली. सचिनचा मृतदेह बघून पोलिसांनी त्याची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना होता. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यातही घेतलं होतं. (Nanded Todays News)

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी केली. चौकशीत संशयिताने आपणच आपल्या साथीदारांसह सचिनचा खून केला असल्याची कबुली दिली. मृत सचिनने नात्यातील एका महिलेचा महिलेचा नको त्या अवस्थेत व्हिडिओ बनवला होता. याचाच राग मनात धरून आरोपींनी सचिनचा कोयत्याने सपासप वार करून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

SCROLL FOR NEXT