Marathi Sahitya Sammelan Saam Tv
महाराष्ट्र

Marathi Sahitya Sammelan: जळगावात होणार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बोधचिन्हाचं झालं अनावरण

Jalgaon News: जळगावात होणार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बोधचिन्हाचं झालं अनावरण

Satish Kengar

>> संजय महाजन

97 Akhil Bharatiya Sahitya Sammelan:

जळगाव ७२ वर्षांनंतर अमळनेर येथे मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून विविध विषयांवर मंथन होईल. यामुळे हे संमेलन महाराष्ट्राला दिशा देणारे ठरेल, असं राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील म्हणाले आहेत.

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बोधचिन्हाच्या अनावरण प्रसंगी ते असं म्हणाले आहेत. पुढच्या पिढीला आदर्श ठरेल असं देणं म्हणून हे संमेलन यशस्वीरित्या आपल्या सर्वांना पार पाडायचं आहे, असंही ते म्हणाले/

अमळनेर येथील प्रताप मिल कंपाउंड मधील बन्सीलाल पॅलेस मध्ये आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय माहेश्वरी, माजी आमदार स्मिता वाघ, मराठी वाङमय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, बोधचिन्ह निर्माते प्राचार्य मिलन भामरे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. (Latest Marathi News)

अमळनेरमध्ये दुसऱ्यांदा साहित्य संमेलन

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात याआधी १९३६ मध्ये संमेलन झाले होते. माधव त्रिंबक पटवर्धन त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. १९५२ मध्ये अमळनेरमध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले होते.

त्यानंतर आता अमळनेर शहरात दुसऱ्यांदा हे संमेलन होत आहे. जळगाव शहरात १९८४ मध्ये संमेलन झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्षस्थान शंकर रामचंद्र खरात यांनी भूषविले होते. म्हणजेच १९८४ आता हे संमेलन जळगाव जिल्ह्यात होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT