वर्धा शहरातील समतानगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरातील कुलरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत ९२ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. मृतकाचं नाव पंजाबराव डोमाजी तामगाडगे असं असून, ते अंथरुणाला खिळलेले होते. या घटनेची तक्रार वर्धा पोलिसात दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
पंजाबराव डोमाजी तामगाडगे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. वर्धेच्या समता नगर परिसरात नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रमोद पंजाबराव तामगाडगे हे आपल्या पत्नी, मुलगा आणि वडील पंजाबराव सोबत राहतात. घरात खाली तीन खोलीत प्रमोद, पत्नी नंदा आणि पुत्र अक्षय राहतात तर वडील अंथरूणाला खिळले असल्यामुळे पहिल्या माळ्यातील एका खोलीत राहायचे.
रात्री गाढ झोपेत असताना घरातील वरच्या खोलीत कुलरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केलं. आग लागली असल्याचे समजताच कुटुंबाने खोलीत धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. वर्धा पालिकेच्या अग्निशमक दलाने घटनास्थळी येत आगीवार नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
मात्र आग इतकी भीषण होती की, ९२ वर्षी पंजाबरावांचा जागीच मृत्यू झाला. तसेच घराचेही नुकसान झाले. आग विझवल्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेची वर्धा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास वर्धा पोलीस करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.