Crime News saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : पतंगाच्या बहाण्याने 9 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; आरोपीला वीस वर्षे कारावास

ही घटना अकोल्यातील पातूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.

अॅड. जयेश गावंडे

Akola Crime News : अकोल्यातून (Akola) एक धक्कदायक घटना समोर आली आहे. नऊ वर्षीय लहान मुलाला पतंगाचं आमिष दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना अकोल्यातील पातूर पोलीस (Police) स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अकोला जिल्हा न्यायालयाने २० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आकाश खोडे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Latest Akola Crime News)

तुला पतंग काढून देतो असा बहाणा करून एका नऊ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकाला अकोला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणी सुनावणी दरम्यान पीडित मुलगा व त्याची आई न्यायालयाला फितूर झाले. मात्र, वैद्यकीय अहवाल व डीएनए अहवाल पॉझीटीव्ह आला. हाच पुरावा ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

नेमकं काय आहे प्रकरण?

नऊ वर्षाचा मुलगा बाहेर खेळायला जातो म्हणून घरून निघून गेला होता. जवळच असलेल्या इस्त्रीच्या दुकानावर दोन माणसे उभी होती, त्यापैकी एका माणसाने तुला झाडाला अडकलेली पतंग काढून देतो असे म्हणून एका खोलीमध्ये त्या मुलाला घेऊन गेला आणि अनैसर्गिक संभोग केला. एवढेच नव्हे तर त्या मुलाला हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, त्याच दिवशी रात्री साडे ७ वाजता पीड़ित अल्पवयीन मुलगा घरी रडत रडत घरी आला आणि घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. लागलीच कुटुंबीयांनी पातूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध कलम ३७७ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४, ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्हयाचा तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोप पत्र सादर केले. या प्रकरणानी आरोपीला २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि १० हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT