Beed : अंधश्रद्धेचे भूत पतीसह सासूच्या मानगुटीवर; गुंगीचे द्रव्य देऊन महिलेसोबत भयंकर कृत्य

शिरूर न्यायालयाच्या आदेशानंतर भोंदूसह पती, सासुवर गुन्हा दाखल
Beed News
Beed NewsSaam Tv
Published On

बीड - पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेचे भूत अनेकांच्या मानगुटीवर बसलेले आहे. असाच काहीसा प्रकार बीडच्या (Beed) शिरूर कासार तालुक्यात उघडकीस आला आहे. तालुक्यातील निमगाव मायंबा येथे अंगात भूत आहे म्हणत, अंगातील भूत काढण्यासाठी एका भोंदूने महिलेला गुंगीचे द्रव्य देऊन काठीने मारहाण केली. तसेच कवड्यांची माळ डोक्यात मारून अघोरा प्रकार केला होता. (Beed Crime News)

Beed News
Waroli Bandh : महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानाचे पुण्यापाठोपाठ मुंबईतही पडसाद; आज वरळी बंद

याबाबत संबंधित चकलांबा पोलिसांनी गुन्हा नोंदवून न घेतल्याने महिलेने शिरूर कासार न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश देत चकलांबा पोलिसांना फटकारले आहे. त्यावरून चकलंबा पोलीस ठाण्यात भोंदूसह पती व सासूवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महिलेच्या अंगात दोन भुते असल्याचं सांगण्यात आलं. हे अंगातील दोन भुते काढण्यासाठी सासू लक्ष्मी व पती कल्याण यांनी 16 फेब्रुवारी 2022 रोजी भोंदूबाबाला गावी बोलावून घेतले. त्याने महिलेला जबरदस्तीने गुंगीचे द्रव व लिंबू पिळून पाण्यात टाकून पाजले.

Beed News
Pandharpur : चर्चा तर होणारच! तृतीयपंथी उमेदवाराने स्टँप पेपरवर प्रसिद्ध केला जाहीरनामा

त्यानंतर काठीने मारहाण केली आणि कवड्यांची माळ डोक्यात मारल्यामुळे जोराचा मार लागून त्या बेशुद्ध झाल्या. काही वेळाने अंगारे- धुपारे केले. त्यानंतर महिलेने वडिलांना बोलावून घेत 21 सप्टेंबर रोजी चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळं त्यांनी शिरूर न्यायालयात दाद मागितली.

दरम्यान शिरूर कासार न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. टी. मांगीरे यांनी 7 डिसेंबरला याबाबत भोंदूवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश चकलांबा पोलिसांना दिले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com