Express train Saam Tv
महाराष्ट्र

देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांचा सशस्त्र दरोडा, रेल्वे थांबवून प्रवाशांची लूट

औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर ८ ते १० जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली

अभिजित सोनावणे

सिकंदराबाद : औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर ८ ते १० जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे, मध्यरात्री दौलताबाद- पोटूळ दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. चक्क सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवून ८ ते १० जणांच्या टोळीने लुटमार केल्याची माहिती मिळाली आहे. जवळपास अर्धा तास हा सगळा प्रकार सुरू होता.

दरम्यान एक महिलेच्या गळ्यातील चैन आणि इतर वस्तू चोरल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे. रेल्वे डब्बा S5 ते S9 वर दगडफेक करण्यात आली आहे. घटनास्थळी ॲम्बुलन्स देखील उभी होती. दरम्यान हे दरोडेखोर ॲम्बुलन्समधून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ५ एप्रिल दिवशी अशाच प्रकारे नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नांदेड (Nanded) मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबवून लुटमार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

हे देखील पहा-

या अगोदर देखील नंदीग्राम एक्स्प्रेस- नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबवून लुटमार करण्यात आली.

औरंगाबाद येथे मुंबई- नांदेड नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडीला पोटूळ रेल्वे स्टेशनजवळ लाल दिवा दाखवून थांबवून रेल्वेत घुसलेल्या ४ ते ५ दरोडेखोरांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि मोबाईल हिसकावल्याची घटना घडल्यानंतर ५ एप्रिल दिवशी रात्री १२.५५ वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेची माहिती देऊन देखील पोलीस यंत्रणा सक्रिय न झाल्याने रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास नांदेड- मनमाड या पॅसेेंजर रेल्वेला (railway) अशाच प्रकारे थांबवून दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांना लुटल्याची दुसरी घटना घडल्याने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मुंबईहून औरंगाबाद मार्गे नांदेडला निघालेली नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुक्रवारी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन येथून औरंगाबादकडे येत होती. यावेळी देखील पोटूळ रेल्वे स्टेशन येथील ग्रीन सिग्नलला दरोडेखोरांनी कपडा बांधून झाकले होते. यामुळे केवळ लाल सिग्नल रेल्वे मोटारमनला दिसल्याने स्टेशनजवळच चालकाने गाडी थांबविली. गाडी थांबताच धारदार शस्त्रे घेऊन रेल्वेतील एका डब्यात घुसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करण्यास सुरुवात केली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

SCROLL FOR NEXT