Corona Virus
Corona Virus Saam Tv
महाराष्ट्र

भंडाऱ्यात कोरोनाचा आलेख वाढताच; शुक्रवारी आढळले 8 नवे रुग्ण

अभिजित घोरमारे

भंडारा : गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात 8 नवीन कोरोना रुग्ण बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. (Bhandara Corona Virus Latest News)

जिल्ह्यात हळूहळू कोरोना वाढू लागला असून, पुन्हा 8 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात आता संक्रमित रुग्णांची संख्या 31 झाली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ठ होऊ लागलं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

विशेष बाब म्हणजे, तिसरी लाट संपल्यानंतर जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. मात्र मे महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरूवात झाली. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तर दररोज रुग्ण आढळून येत आहे.

सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 31 सक्रिय रुग्ण असून यामधील 15 रुग्ण भंडारा तालुक्यातील आहे. तर पवनीत 8 रुग्ण, तुमसरात 5 रुग्ण तसेच मोहाडी, लाखनी आणि लाखांदूरमध्ये प्रत्येक 1 रुग्णाचा समावेश आहे. दिवसागणिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madha Constituency: झुकणार नाही लढणार! निवडणुकीनंतर अनेक गोष्टींना तोंड देण्याची माझी तयारी; धैर्यशील मोहिते पाटलांचे फडणवीसांना प्रतिआव्हान

Bhabha Hospital News : पेशंटकडून नर्सला मारहाण, कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन

Panchayat 3 Released Date : अखेर ठरलं..., 'पंचायत ३' याच महिन्यात रिलीज होणार; कहाणीत कोणता नवा ट्वीस्ट येणार ?

Today's Marathi News Live : राणे-तटकरेंचा पराभव करण्यासाठी ठाकरे पितापुत्र कोकणात

Raju Patil News : आम्ही सतत पाठिंबा द्यायला बसलेलो नाही, राजू पाटील यांचा महायुतीला इशारा?

SCROLL FOR NEXT