योगेश काशीद, साम टीव्ही
राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73.4 कोटीचा घोटाळा उघडकीस आला आहे. उपजिल्हाधिकारी यांनी भूसंपादनाबाबत केलेल्या तक्रारीवरून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भूसंपादनातील अधिकारी, कर्मचारी, वकील यांनी संगनमताने हा कोट्यावधीचा घोटाळा केल्याचे प्रथमदर्शी उघडकीस आले असून बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारणातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती पाहता तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर हे या एसआयटीचे प्रमुख असून याबाबचा अधिक तपास सुरू आहे. महसूल विभागातील मोठे मासे या घोटाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.
भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दहा जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महसूल अधिकारी, कंत्राटी कर्मचारी, वकील यांचा समावेश आहे. तिघा जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती एसआयटीचे प्रमुख ASP सचिन पांडकर यांनी दिली. प्राथमिकरित्या 73 कोटीचा हा घोटाळा आहे. यामध्ये बनावट सह्या केलेल्या आहेत असं निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. असं एसआयटी प्रमुखांनी सांगितलं आहे.
पुणे येथील मुंढवा जमीन घोटाळा समोर आल्यानंतर आता राज्यात अनेक ठिकाणचे घोटाळे उघडकीस होत आहे. विशेष म्हणजे यामध्ये लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि त्यांचे मुलांचेच नाव समोर येत असते. आता या बीडच्या भूसंपादन घोटाळ्यामध्ये कोणत्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांची नावे समोर येता आणि त्यांच्यावर काय कारवाई होते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.