चिखली शहरातील नगरपालिकेची ७२ लाखाची व्यायाम शाळा गेली चोरीला संजय जाधव
महाराष्ट्र

नगरपालिकेची ७२ लाखाची व्यायाम शाळा चोरीला

जर आठ दिवसात कारवाई केली गेली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव

बुलढाणा - जिल्ह्यातील नगरपालिका Municipality अंतर्गत १३४ कोटी रुपयांचे विकास कामे करण्यात आले. मात्र ही सर्व कामे कागदोपत्री झाल्याची माहिती अधिकारात मागितलेल्या माहितिद्वारे उघड झाली. या भ्रष्टाचाराची corruption चौकशी करून कारवाई करण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे केली होती. 72 lakh rupees gym of Chikhali municipality was stolen

जिल्हा प्रशासन दखल घेत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने टॉवर वर चढून शोले आंदोलन केले. तेव्हा जिल्ह्याधिकारी यांनी त्री सदस्य चौकशी समिती नेमुन चौकशी साठी चिखली येथे पाठविले तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चिखली शहरातील बाबूलाल चौकात नगरपालिकेच्या वतीने ७२ लाख रुपयांची बांधण्यात आलेल्या व्यायाम शाळेची पाहणी केली. मात्र त्या ठिकाणी एका ट्रस्टच्या मालकीची जागा असून तिथे मुस्लिम समाजाचा शादी खाना बांधलेला आढळून आला आहे.

हे देखील पहा -

चौकशी समितिने केलेल्या पाहणीत कुठेही व्यायाम शाळा आढळून आली नाही. त्यांमुळे नागरपालिकेची व्यायाम शाळा गेली कुठे असा प्रश्न चिखलीतील नागरिकांना पडला आहे. म्हणुन चिखली नगरपालिकेने 72 लाख रुपयाची बांधलेली व्यायाम शाळा चोरीला गेली असल्याचे स्प्ष्ट झाले आहे. 72 lakh rupees gym of Chikhali municipality was stolen

चौकशी समितीने या व्यायाम शाळेचा अहवाल तात्काळ जिल्ह्याधिकारी यांच्याकडे सादर करुण दोषी मुख्याधिकारी, अभियंता व संबधित नगरपालिका सदस्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मयूर बोर्डे यांनी केली आहे. जर आठ दिवसात कारवाई केली गेली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT