पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि त्या अर्तंगत येणाऱ्या ७ पंचायत समिती पोट निवडणूकीसाठी ७ तालुक्यातील केंद्रावर एकूण ६९.१५ टक्के मतदान सायंकाळी साडेपाच वाजेपर्यत झाले आहे. याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली आहे. त्यांनी ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस, तंत्रज्ञ आणि एकूणच सर्व यंत्रणांचे अभिनंदन केले आहे.
हे देखील पहा-
पालघर जिल्हा परिषद आणि ७ पंचायत समिती मधील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. वणई गटामध्ये सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून दिले आहे. आपला राजकीय वारसदार म्हणून स्वतःचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरविले आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनीही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
सरासरी- 66.64%
डहाणू- 63.27%
विक्रमगड- 74.16%
मोखाडा- 68.88%
वाडा- 71.92%
पालघर- 70.06,%
वसई- 75.34%
पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणूक मतदान
एकूण मतदार - 3,67,602
झालेली मतदानाची आकडेवारी
वेळ 7.30 ते 5.30 वाजेपर्यंत
पुरुष मतदान- 1,30,738
स्त्री मतदान- 1,23,476
एकूण मतदान- 2,54,215
टक्केवारी - 69.15 %
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.