Satara: भरधाव कारची 7 जणांना धडक, मद्यधुंद ड्रायव्हरची बाईकस्वाराला धडक...(पहा व्हिडिओ)
Satara: भरधाव कारची 7 जणांना धडक, मद्यधुंद ड्रायव्हरची बाईकस्वाराला धडक...(पहा व्हिडिओ) Saam Tv
महाराष्ट्र

Satara: भरधाव कारची 7 जणांना धडक, मद्यधुंद ड्रायव्हरची बाईकस्वाराला धडक...(पहा व्हिडिओ)

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सातारा : मद्यधुंद अवस्थेमध्ये कार चालक तब्बल ७ जणांना धडक (Satara Accident) दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ गाड्या आणि ३ दुचाकींना उडवल्यानंतर ही कार अखेर झाडावर धडकली आहे. त्यानंतर चालकाला कारमधून बाहेर काढत पादचाऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.

पहा व्हिडिओ-

मात्र, ७ जणांना धडक दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. सातारा (Satara) जिल्ह्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात (Accident) घडल्याची माहिती मिळाली आहे. सातारा शहरात राजपथावर सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास नगरपालिका (Municipality) ते कमानी हौद या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये असणाऱ्या चालकाने कार भरधाव वेगात चालवत होता. यावेळी त्याने 7 जणांना उडवले आहे.

भरधाव कार कमानी हौदाजवळ आल्यानंतर एका झाडाला धडकली. त्यावेळेस मद्यधुंद अवस्थेमध्ये असणाऱ्या कारमधील (Car) चालकाला बाहेर काढून स्थानिक नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. सातारा शहर पोलिस (Police) ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी तात्काळ कार चालकास ताब्यात घेतले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 Final: चेन्नईत रंगणार फायनलचा थरार! तिकीट कसं बुक करायचं अन् सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत किती?

Special Report | आपल्या गळ्यातील हार थट ईव्हीएमला घातला! शांतीगिरी महाराजांना हार घालणं भोवलं

Jayant Patil Letter: लढाई अद्याप संपलेली नाही, ५ व्या टप्प्यातील मतदान संपताच जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना भाविनक पत्र

Kalyan Loksabha Update | जिंकणार तर अमचाच नेता, असं म्हणत मतदान होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष

Loksabha Election: कुलाब्यात ठाकरे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा; नार्वेकरांना पाहून उबाठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT