पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुक्ताईनगरकडे जात असताना हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये त्यांच्या वाहनाची किरकोळ तोडफोड झाली असून, रोहिणी खडसे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या हल्ल्याची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी गंभीर दखल घेतली आहे. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी चाकणकर यांनी यावेळी केली आहे.
पहा व्हिडिओ-
रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला आहे. या हल्ल्यामधून खडसे सुखरूप बचावले आहेत. वाहनाचे नुकसान झाले. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करते. हल्ला करणारे कोणीही असू दे ते सुटता कामा नये, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जळगाव (Jalgaon) पोलीस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करून, त्यांना अटक (Arrested) करावे अशी मागणी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला आहे. रात्रीच्या अंधारात हा हल्ला कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. प्राणघातक हल्ला करून हल्लेखोराने पळ काढल्याने त्याला पकडण्यात यश आले नाही. मात्र शिवसेना (Shiv Sena) आमदार चंद्रकांत पाटील आणि रोहिणी खडसे यांच्यातील वाद ताजा असताना ही घटना घडली आहे. यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून, हल्लेखोराला लवकरात लवकर अटक करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.