shirdi, sai baba, sai baba sansthan saam tv
महाराष्ट्र

Shirdi News: भाविकांचे दातृत्व, शिर्डीतील दानपेटीत तीन काेटींची वाढ; 2 लाख भाविकांनी घेतला साईंचा आशीर्वाद

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Shirdi News : गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई भक्तांनी शिर्डीत (shirdi) अलोट गर्दी केली हाेती. दर्शन रांगा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या हाेत्या. भाविकांनासाठी साईमंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात आले हाेते. या तीन दिवसांच्या उत्सवानंतर साईंच्या चरणी भाविकांनी तब्बल सात कोटींचे दान (7 crore donation in shirdi temple) दिल्याची माहिती संस्थानने दिली. (Maharashtra News)

साई समाधी मंदिरासह साईबाबांच्या गुरुस्थान मंदिराचे दर्शन घेण्यासाठी साई भक्तांमध्ये गेले तीन दिवस उत्साह हाेता. साई भक्तांसाठी गुरुस्थान मंदिराचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे भाविक माेठ्या संख्येने शिर्डीत येतात. यंदा तीन दिवसात 2 लाख भाविकांनी साईंचे दर्शन घेतल्याची माहिती संस्थानने दिली.

यंदा भाविकांकडून दानपेटीत 2 कोटी 65 लाख, देणगी काऊंटरवर एक कोटी 18 लाख, सशुल्क पास द्वारे 67 लाख 33 हजार, डेबीट, क्रेडीट, चेक तसेच ऑनलाइनच्या माध्यमातून 2 कोटी 18 लाख, 25 लाख रुपये किमतीचे 472 ग्राम सोने तसेच 2 लाख 63 हजार रुपये किमतीची साडेचार हजार किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे.

गतवर्षीच्या उत्सवापेक्षा यावर्षी दानात तीन कोटींची वाढ झाल्याची माहिती पी. शिवा शंकर, (सीईओ साईबाबा संस्थान शिर्डी (2023 डोनेशन) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT