Nandurbar: जिल्ह्यात पोटनिवडणूकीत 67.15 टक्के मतदान  Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar: जिल्ह्यात पोटनिवडणूकीत 67.15 टक्के मतदान

नंदुरबार पोटनिवडणूकीत जिल्हा परिषदेच्या 11 गट आणि पंचायत समितीच्या 14 गणांसाठी 77 उमेदवारांमध्ये लढतीत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज निकाल स्पष्ट होणार

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नंदुरबार पोटनिवडणूकीत जिल्हा परिषदेच्या 11 गट आणि पंचायत समितीच्या 14 गणांसाठी 77 उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज निकाल स्पष्ट होणार आहे. पोटनिवडणुकीत राजकीय नेत्यांच्या कुटुंबातूनच सर्वाधिक उमेदवार असल्याने घटक पक्षांचे नेत्यांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे.

हे देखील पहा-

जिल्हा परिषदेच्या 18 गटांसाठी 35 उमेदवार तर पंचायत समितीच्या 14 गणांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील कोराई गणात माघारी अंती शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध झाल्याने त्यांचा विजय निश्चित झालेला आहे. एकूणच नंदुरबार जिल्ह्यातील पोटनिवडणुकीचे चित्र भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे पाहायला मिळत आहे.

माजी मंत्री तथा भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्येने कोळदे गटातून राजकारणात पदार्पण केले आहे, तर आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी यांच्या भगिनीने खापर गटातून भाजपचे उमेदवार नागेश पाडवी यांच्याविरुद्ध जोरदार टक्कर दिली आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी यांनी पुन्हा कोपरली गटातून निवडणूक लढवली आहे. यामुळे जिल्ह्यातील तिन्ही प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये कोण वर्चस्व राखेल, हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT