Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: संतापजनक! बीडच्या आष्टीत 2 दिवसात 66 जनावरांचा तडफडून मृत्यू, नेमकं करण काय?

ही संतापजनक घटना बीडच्या आष्टीत उघडकीस आलीय...

विनोद जिरे

Latest Beed News : एकाच टेम्पोतून तब्बल 102 वासरे, गायी कत्तलीसाठी नेली जात होती. सुदैवाने पोलिसांनी ते पाहिले आणि सुटका केली. या कारवाईच्या वेळीच 21 जनावरे दगावलेली होती, तर नंतर गोशाळेत गेल्यावर जखमी व इतर कारणांनी तब्बल 45, अशा दोन दिवसांत 66 जनावरांचा तडफडून मृत्यू झाला. तर अद्यापही 36 जनावरांची प्रकृती चिंताजनक असून, ते अखेरचा श्वास घेत आहेत. ही संतापजनक घटना बीडच्या आष्टीत उघडकीस आलीय. (Latest Marathi News)

अहमदनगरच्या (Ahmednagar) हादगाव येथून धाराशिवला कत्तलीसाठी अवैध जनावरे घेऊन जाणारा टेम्पो, आष्टी शहरातून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी आष्टी शहरातील किनारा चौकात सापळा लावून हा टेम्पो अडवला. यात एकाच टेम्पोत खाली 52 आणि वर फळ्यावर 50 अशी 102 जनावरे दिसून आली. ही जनावरे अक्षरश: एकावर एक दाटीवाटीत होती.

गर्दीमुळे एकमेकांना घासल्याने त्यांना जखमाही झाल्या होत्या. यात काही लहान वासरेही होती. याच दाटीवाटीमुळे टेम्पोमध्येचं 21 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर जनावरांची सुटका करून पोलिसांनी (Police) त्यांना कर्जत तालुक्यातील कामधेनूनगर येथील दगडवाडीतील श्री रुक्मिणी माता गोशाळेत दाखल केले.

मात्र अति जखम आणि त्रास झाल्याने यातील 40 लहान वासरे आणि 5 गायी अशा 45 जनावरांचा दोन दिवसांत मृत्यू झाला. तर इतर 36 जनावरांचीही रोगप्रतिकारशक्ती नाजूक असून अन्न, पाणी वर्ज केल्याने त्यांचीही प्रकृती नाजुक आहे.

दरम्यान याप्रकरणी बीडच्या (Beed) आष्टी पोलीस ठाण्यात, टेम्पो चालक जलाल शेख वय 23 रा. हादगाव जि. अहमदनगर व टेम्पो मालक फिरोज रशीद शेख रा.धाराशिव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग

Viral Fever: दिवाळीनंतर वायरल तापाचा धोका वाढतो? जाणून घ्या कारण

Raigad Crime: सोशल मीडियावरच्या प्रेमासाठी तोडली सात वचनं; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने काढला पतीचा काटा

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच राजकारण तापलं, स्वबळाचा नारा, उदय सामंतांचा मित्रपक्षाला इशारा

Diwali Abhyang Snan Positivity: अभ्यंगस्नान करताना अंघोळीच्या पाण्यात टाका या वस्तू, शरीरात दिसतील चांगले बदल

SCROLL FOR NEXT