Latur News Saam Tv
महाराष्ट्र

Latur: राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ

ग्रामपंचायत कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळाने मानलं आभार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूर - राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यासाठी तत्कालीन ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्याकडे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी पाठपुरावा केला होता, वेतनवाढ मिळणार असल्याचा आदेश ग्राम विकास विभागाने निर्गमित केला आहे. त्याबद्दल ग्रामपंचायत कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळाने माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

हे देखील पाहा -

महाविकास आघाडी सरकारने ग्रामविकास महत्त्वाचे योगदान असलेल्या राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन ११६२५ ते १४१२५ रुपये देण्यासाठी निर्णय घेतला आहे. याकरिता राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी तत्कालीन ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा केला होत.

वेतनवाढ मिळणार असल्याचा आदेश ग्राम विकास विभागाने निर्गमित केला आह. त्याबद्दल शिष्टमंडळाने बाभळगाव येथे भेट घेऊन आभार मानले आहेत. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन मराठवाडा विभागीय अध्यक्ष दयानंद येरंडे, लातूर जिल्हा अध्यक्ष नवनाथ नरवडे, आर्वीचे सरपंच धनंजय उर्फ पप्पू देशमुख, अनिल देसाई, विकास पवार, अमोल बनसोडे, कृष्णा भगाडे, भागवत गरड आदी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बारामतीत ठरलं, तुतारी-घड्याळ झेडपीलाही एकत्र

Malavya Rajyog 2026: एका वर्षानंतर शुक्र बनवणार मालव्य राजयोग; या तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ

MNS-Shivsena: ठाकरेंचे मुंबईत किती नगरसेवक?, शिवसेना-मनसेच्या विजयी शिलेदारांची यादी वाचा एका क्लिकवर

Raj Thackeray reaction : काय चुकलं? पराभवानंतर राज ठाकरे निराश, व्यक्त केले दु:ख; म्हणाले, दोन्ही...

Shani Mantras For Success In Job: नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवीये? शनिदेवाच्या 'या' मंत्राचा करा जप

SCROLL FOR NEXT