औरंगाबाद : 6 वर्षीय चिमुकलीवर नराधमाकडून बलात्कार!  
महाराष्ट्र

औरंगाबाद : 6 वर्षीय चिमुकलीवर नराधमाकडून बलात्कार!

घरा शेजारी खेळत असलेल्या 6 वर्षाच्या चिमुकलीवर एका 45 वर्षाच्या नराधमाने घरात नेऊन लैंगिक अत्याचार केला. मात्र, चिमुकलीच्या रडण्याने घटना उघडकीस आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- अविनाश कानडजे

औरंगाबाद : औरंगाबाद मधील राजनगावमध्ये सहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराजवळ खेळत असलेल्या सहा वर्षीय चिमुकलीला शेजारी राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय नराधमाने त्याच्या खोलीत घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र, वेदना असह्य होत असल्याने ती जोरात ओरडल्याने शेजारी धावले. ही अत्यंत खबळबळजनक घटना वाळूज परीसरातील रांजणगाव येथे काल भर दुपारी घडली.

हे देखील पहा :

वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव येथील एका वाड्यात दहा ते बारा जण भाड्याने राहतात. पंचेचाळीस वर्षीय नराधम आरोपी तुकाराम परसराम जाधव हा पिडीत चिमुकलीच्या घराजवळ किरायाच्या खोलीत राहतो. तो खाजगी व्यवसाय करतो. मंगळवारी रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास सहा वर्षीय चिमुकली घराजवळ खेळत होती. तीला उचलून घरात घेऊन जाऊन दरवाजा आणि खिडक्या बंद केल्या. चिमुकलीवर तो लैंगिक अत्याचार करु लागला. मात्र वेदना सहन होत नसल्याने ती जोरजोरात ओरडत होती.

तिच्या ओरडण्याचा आवाज आल्याने तीची आई आणि शेजारील पाच ते सहा जण जमा झाले. हा आवाज जाधव याच्या खोलीमधून येत होता. परंतु त्याच्या खोलीचा दरवाजा आणि खिडक्या बंद होत्या. घरासमोर जमा झालेल्या लोंकानी लाथा मारुन जाधव याच्या घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी तेथे नराधम जाधव हा मुलीवर लैंगिक आत्याचार करतांना दिसून आला. आईने जमा झालेल्या लोंकाच्या मद्दतीने चिमकलीची त्याच्या तावडीतून सुटका करत घरी नेले. मात्र, पिडीत चिमुकली ही अत्यंत बेदरलेली होती.

दरम्यान, आपण पकडले जाऊ नये म्हणून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच जमा झालेल्या लोंकानी नराधम जाधव यास ताब्यात घेऊन पोलीसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नराधम तुकाराम परसराम जाधव यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पुढील तपास पोलीस निरिक्षक सचिन इंगोले हे करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT