6 lakh 80 thousand items seized in the action of state excise department in Latur दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

Latur Crime News : या माहितीवरुन पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला असता या ठिकाणी एकूण १३ बॉक्स गोवा राज्याच बनलेल्या विदेशी दारुचा साठा आढळून आला.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर: तालूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत तब्बल ४ लाख ९० हजारांचा अवैध दारुसाठा (Stock of liquor) जप्त केला आहे. गोवा राज्यातून अनधिकृतपणे ही दारु आणून त्याचा साठा केल्याने एका हॉटेलवर ही कारवाई करण्यात आली आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील अजिंक्यतारा नावाच्या हॉटेलवर ही कारवाई करण्यात आली आहे. (Latur Crime News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनिल चव्हाण, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिलेल्या आदेशानुसार आणि विभागीय उपआयुक्त प्रदिप एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्याता आली. यात लातूर जिल्ह्यातील अधीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, लातूर यांच्या स्टाफने उड्डाण पुलाजवळ, बार्शी रोड लातूर या ठिकाणी ही कारवाई केली. सदर ठिकाणी एक दुचाकी स्कूटी एमएच २४ एच २२३२ वर अवैध वाहतूक करित असतांना २ बॉक्स गोवा निर्मिती विदेशी मद्य जप्त करण्यात आले. यानंतर पकडलेल्या आरोपींची चौकशी केली असता सदर अवैध मद्य हॉटेल अजिंक्यतारा येथे घेवून जात असल्याचे त्यांनी सांगितसे. या माहितीवरुन पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला असता या ठिकाणी एकूण १३ बॉक्स गोवा राज्याच बनलेल्या विदेशी दारुचा साठा आढळून आला. याची किंमत ६ लाख ८० हजार इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या गुन्ह्याच्या पुढील तपासात आरोपींच्या सांगण्यावरुन बसवंतनगर, जि. लातूर येथे मुद्देमाल लपविल्याचे कळल्यावरुन तेथे राहते जागेत छापा टाकला असता त्या ठिकाणी ५० बॉक्स गोवा राज्य निर्मित अवैध मद्य तसेच सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक मारुती व्हॅन जप्त करण्यात आली. त्याच गुन्ह्याच्या तपासात मौ. बोरगांव काळे, ता. जि. लातूर येथील एका शेतात छापा मारला असता त्या ठिकाणी २० बॉक्स गोवा राज्य निर्मित अवैध विदेशी मद्य मिळून आले. तसेच एका आरोपीच्या घरी म्हाडा कॉलनी येथे १० बॉक्स गोवा राज्य निर्मित अवैध मद्य तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आले. सर्व मिळून एकूण ९५ बॉक्स गोवा राज्य निर्मित अवैध मद्य तसेच एक चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनं जप्त करण्यात आली. त्यापैकी गोवा बनावटीच्या जप्त अवैध विदेशी मद्याची किंमत रु. ४ लाख ९० हजार ४० आणि गुन्ह्यात वापरलेल्या जप्त वाहनाची किंमत रु. १ लाख ९० हजार बाटली, बुचे, बॉक्स असे साहित्य असा एकूण ६ लाख ८० हजार ४० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT