Amaravati shocking Saam tv
महाराष्ट्र

५६ वर्षांच्या नराधमाकडून ६ वर्षीय मुलीवर शाळेच्या आवारात अत्याचार; अमरावतीमधील खळबळजनक घटना

Amaravati shocking : ५६ वर्षांच्या नराधमाने ६ वर्षीय मुलीवर शाळेच्या आवारात अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Saam Tv

अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात ६ वर्षीय मुलीवरील अत्याचार

५६ वर्षीय व्यक्तीला पोलिसांकडून तातडीने अटक

पालकांनी शाळेचा सीसीटीव्ही तपासल्यानंतर तक्रार नोंद

अमर घटारे, साम टीव्ही

राज्यात महिला लैंगिक अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसभरात एकतरी महिला नराधमाच्या वासनेला बळी पडत आहे. शहरापासून खेड्यामध्येही महिलांवर अत्याचार होत आहे. महिलांपासून चिमुरड्या मुलीही अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. अमरावतीमध्येही अवघ्या ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील एका गावात मुलगी अत्याचाराला बळी पडली. या गावातील शाळेतील ६ वर्षांची मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी ५६ वर्षीय व्यक्तीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.

नराधमाने मंगळवारी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास पीडित चिमुरडीला शाळेच्या आवारात नेऊन तिच्यासोबत हे कृत्य केलं. या कृत्यानंतर पीडित मुलीने घरी जाऊन आई-वडिलांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर आई-वडिलांनी शाळेत जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात संशयिताची हालचाल दिसल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने तक्रार दाखल केली.

चांदूर बाजार पोलिसांनी तातडीची कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी चांदूर बाजार पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

मालेगावात १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

नाशिकच्या मालेगावमध्ये काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन १४ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. शाळकरी मुलीला शाळेला जातानाफूस लावून दुचाकीवर बळजबरीने बसवून गिरणा धरणावर नेलं. त्याच भागात त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं. या प्रकरणी आरोपीवर पोस्को अंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT