Yavatmal News Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal News: शिळे अन्न खाल्ल्याने आश्रमशाळेच्या ५५ विद्यार्थ्यांना विषबाधा, ३० जणांची प्रकृती चिंताजनक

55 Students Poisoned In Yavatmal: सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी खासगी (Private Hospital) आणि शासकीय रुग्णालयामध्ये (Government Hospital) दाखल करण्यात आले आहे.

Priya More

संजय राठोड, यवतमाळ

Yavatmal Ashram Shala News:

यवतमाळमध्ये (Yavatmal) शिळे अन्न खाल्ल्यामुळे ५५ विद्यार्थ्यांना विषबाधा (Poisoned) झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यवळतमाळच्या पुसद तालुक्यातील हुडी येथे ही घटना घडली आहे. सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी खासगी (Private Hospital) आणि शासकीय रुग्णालयामध्ये (Government Hospital) दाखल करण्यात आले आहे. यामधील तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या पुसद तालुक्यातील हुडी येथील गिरधारी महाराज व्हीजेएनटी आश्रम शाळेमध्ये ही घटना घडली आहे. या आश्रम शाळेतील ५५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांना शिळे अन्न खायला दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

शिळे अन्न खाल्ल्यामुळे आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या ५५ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तात्काळ पुसद येथील खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामधील २५ ते ३० विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या विद्यार्थ्यांनी रात्रीचे शिळे अन्न सकाळी गरम करुन खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT