Nashik News : नाशिकमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव येथे ५० ते ६० जणांना महाप्रसादातून विषबाधा झाली आहे. ठाणगाव येथे हनुमान जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन समस्त गावकरी यांच्या तर्फे करण्यात आले होते. (Hanuman Jyanti)
सकाळी नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान काल्याचे किर्तन होते. या महाप्रसादातून विषबाधा झाल्याचे गावकऱ्यांकडून समजले आहे. या सर्वच रुग्णांना नाशिकच्या बाऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वैद्यकीय अधिकारी सदर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस निरीक्षक वाघ यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच महाप्रसादाचा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
मात्र आज गुड फ्रायडे दिनानिमित्त सुट्टी असल्याने सर्वच आरोग्य कर्मचारी रुग्णालयात उपस्थित नव्हते. रुग्णांवर उपचार सुरू असून विषबाधेच्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काल गावात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महाप्रसाद देखील ठेवण्यात आला होता. या महाप्रसादाचा लाभ सर्व गावकऱ्यांनी घेतला. सर्वांनाच हा प्रसाद मिळाला आहे. त्यातील ५० ते ६० व्यक्तींना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. गावात सर्वांनी या प्रसादाचा लाभ घेतल्याने रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.