Pushpa 2 First Poster : लिंबाचा हार, जरीची साडी, नाकात नथ; अल्लू अर्जुनचा खत्री लूक पाहून तुमचाही उडेल थरकाप

उद्या अल्लू अर्जूनचा वाढदिवस असल्याने निर्मात्यांनी त्या आधीच त्याचा फस्ट लूक आणि चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.
Pushpa 2 First Poster
Pushpa 2 First PosterSaam TV

Poster Release : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशात आता पुष्पाचा खतरनाक किलर लूक समोर आलाय. 'पुष्पा २' या चित्रपटामधील अल्लू अर्जुनचा फ्सट लूक पोस्ट करण्यात आला आहे. उद्या अल्लूचा वाढदिवस असल्याने निर्मात्यांनी त्या आधीच त्याचा फस्ट लूक आणि चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.

पुष्पाचा नवा लूक व्हायरल

पुष्पा चित्रपटामध्ये अल्लूचा लूक सुरूवातीलाच एकदम रावडी ठेवण्यात आला होता. एक खांदा खाली वाकवत त्याचा ऍटीट्यूड चाहत्यांना फार भावला. अशात आता त्याचा 'पुष्पा २' या चित्रपटातील लूक समोर आला आहे.

Pushpa 2 First Poster
Fire Viral Video: सिगरेट पेटवताच घडला मोठा अनर्थ...; दोन मिनिटांची मजा अन् जन्मभराची मिळाली सजा...

यामध्ये दिसत आहे की, अल्लूने साडी नेसली आहे. तसचे कपाळावर चमकणारी चंद्रकोर, ओठाला लाली, नाकात नथ, गळ्यात लिंबाचा मोठा हार त्याने घातला आहे. हा खत्री लूक पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय.

पुष्पाचा भन्नाट टीझर देखील समोर आला आहे. यामध्ये पुष्पामध्ये असलेले गुण त्याचा स्वभाव, त्याच्यासाठी जनता किती वेडी झाली आहे हे दिसते. सुरुवातीला जेलमधून तो फरार झाल्याचे त्याचे कुटुंबीय टिव्हीवरील बातम्यांमधून ऐकताना दिसत आहेत. त्यानंतर वाघ देखील पुष्पाला घाबरल्याचे दृश्य दिसत आहे.

Pushpa 2 First Poster
Ujjain Viral Video: तरुण धावत्या ट्रेनमधून खाली पडला, अंगावरून दोन डब्बे गेले अन्...; हृदय हेलावणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

उद्या ८ एप्रिल रोजी अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी हे मोठं आणि विशेष गिफ्ट असणार आहे. 'पुष्पा २' चा टीझर आणि या चित्रपटातील अल्लूच्या लूकवर चाहते वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. हा लूक पाहून चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात शिगेला पोहचली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com