नाशिकच्या प्रेस नोटमधून 5 लाखांच्या नोटा गायब !... (पहा व्हिडीओ) चोरी झालेल्या नोटांचा आकडा वाढू शकतो..
महाराष्ट्र

नाशिकच्या प्रेस नोटमधून 5 लाखांच्या नोटा गायब !... (पहा व्हिडीओ)

चोरी झालेल्या नोटांचा आकडा वाढू शकतो..

अभिजित सोनावणे

अभिजित सोनावणे

नाशिक : नाशिकच्या करंसी प्रेस नोट Currency press note मधून तब्बल पाच लाखांच्या नोटा गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन आठवड्यांपूर्वी ही घटना उघड झाली आहे. तर अत्यंत गोपनीय रीत्या हि चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. करंसी प्रेस नोट मधील अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून या नोटा गायब झाल्याने खळबळ माजली आहे. 5 lakh notes missing from Nashik press note

प्रत्यक्ष चोरी झालेल्या नोटांचा आकडा अधिक असण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. चोरीच्या घटनेबाबत करंसी प्रेस नोट प्रशासनाने याबाबत मौन बाळगलेले आहे. तर या चोरी प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

चलनी नोटा ज्या ठिकाणाहून बाजारात येतात, करंसी नोट प्रेस मध्ये या सर्व पाचशे, शंभर, दोनशेच्या नोटा त्या ठिकाणी छापल्या जातात. तेथून रिझर्व्ह बँकेकडून RBI या सर्व नोटा बाजारामध्ये येत असतात. त्यामुळे या करंसी नोट प्रेसच्या परिसरात अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते.

अगदी कोणालाही ये जा करण्यास परवानगी नसते. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा पूर्ण तपासणी केली जाते. तसेच कोणतीही वस्तू नेण्याची किंवा आणण्याची परवानगी नसते. त्यामुळे अगदी चोख व्यवस्था असतानाही 5 लाखांच्या नोटा त्या ठिकाणाहून गायब झालेल्या आहेत.

विशेष बाब म्हणजे जवळपास दोन आठवड्यांपूर्वी हा सर्व प्रकार लक्षात आलेला होता. त्यानंतर गोपनीय चौकशी करंसी प्रेस नोट प्रसनांकडून या संदर्भात केली जात आहे. मात्र अद्यापही या 5 लाखांचा हिशोब लागत नाही आहे. हे 5 लाख रुपये नेमके कसे गायब झाले ? की या नोटांची चोरी झाली हे कोडे सुटले नाही.

त्यामुळे पोलीस देखील या संदर्भात कशापद्धतीने तपास करत आहेत हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT