फायनान्स कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगुन ट्रक पळवणाऱ्या ५ आरोपींना अटक अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

फायनान्स कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगुन ट्रक पळवणाऱ्या ५ आरोपींना अटक

स्वतः फायनान्स कंपनीचे वाहन सीझ करणारे अधिकारी सांगून ट्रक पळविणाऱ्या 5 आरोपींना देवरी पोलिसांनी केली अटक करत 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अभिजीत घोरमारे

गोंदिया: स्वतः फायनान्स कंपनीचे वाहन सीझ करणारे अधिकारी सांगून राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकत ट्रक चालकाला अडवून तो ट्रक मजूरांसह पळवुन नेणाऱ्या 5 आरोपींना गोंदिया जिल्ह्यातच्या देवरी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे. शुभम सोनकर वय 29 वर्ष, विशाल कुशवाह वय 22 वर्ष, रोशन सिंग वय 25 वर्ष, करण सिंग वय 25 वर्ष आणि लुकेश सिंग वय 24 वर्ष सर्व राहणार भिलाई असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे असून त्यांच्या कडून 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (5 accused arrested for hijacking truck claiming to be finance company officials)

हे देखील पहा -

2 मजूरांसह नागपुरहून माल भरून गडचिरोली जिल्ह्याच्या बोरी गावाकडे राष्ट्रीय 6 वरुण निघालेल्या ट्रकला देवरीच्या मिलन ढाबाजवळ ओवर टेक थांबवत त्याला आपन फायनान्स कंपनीचे वाहन सीझ करणारे अधिकारी असल्याची बतावनी करून ट्रक ताब्यात घेतला. मात्र मालकाने वेळेवर गाडीचा हप्ता भरल्याने चालकासह संशय आल्याने मालकाला फोन लावला असता आरोपींनी त्यांच्या मोबाइल हिसकावुन ट्रक ताब्यात घेत छत्तीसगढकडे जाण्यास निघाले. चालकाचा फोन बंद आल्याने मालकास संशय आल्यावर आपल्या देवरी येईल नातेवाईकास फोन करत देवरी पोलिसात तक्रार केली असता पोलिसांनी छत्तीसगढ राज्यकडे जाणाऱ्या रस्त्यावर शोध घेतला. अखेर चिचोला गावाजवळ संबधित ट्रक व आरोपी आपल्या कारसह आढळल्यावर देवरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

आरोपी कडून 22 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध 395,365 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेने अनेक गुन्ह्यांची उकल होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT