पहलगामचा बदला भारतानं 15 दिवसांनी घेतला. मात्र या बदल्यासाठी पंतप्रधान मोदींनी तब्बल 47 गुप्त बैठका घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पाकिस्तानमधील धमाके याचं प्लॅनिंग कसं झालं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
तारीख- २२ एप्रिल २०२५
ठिकाण- जम्मू काश्मीरमधील पहलगाम
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ निष्पाप भारतीयांची हत्या केली आणि इस बार कुछ बडा करेंगे हे सौदी अरेबियातच ठरवून पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडला आणि सुत्र फिरवली. त्यानंतर सुरु झाला बैठकांचा सिलसिला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तीन्ही सैन्यदलाचे प्रमुख अनिल चौहान, रॉ आणि आयबीचे प्रमुख यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत पंतप्रधान मोदींनी तब्बल ४७ गुप्त बैठका घेतल्या आणि ७ मे ला थेट पाकिस्तानला तगडा झटका दिला.
मात्र ऑपरेशन सिंदूर प्रत्यक्षात आणण्याआधी पंतप्रधान मोदींच्या टॉप सिक्रेट बैठकांचा घटनाक्रम कसा होता? पाहूयात..
हल्ल्याच्याच दिवशी पाकवर स्ट्राईकचा निर्णय
भारतात दाखल होताच गुप्तचर आणि संरक्षण अधिकाऱ्यांसोबत टॉप सिक्रेट बैठक
दहशतवाद्यांच्या शोधमोहिमेच्या क्षणाक्षणाच्या माहितीवर लक्ष
पाकला चकमा देण्यासाठी वेगवेगळ्या रणनिती
दहशतवादी तळांवर हल्ल्यासाठी ३ प्लॅन बनवले
६ मे
टॉप सिक्रेट बैठकीनंतर प्लॅन ए राबवण्याचा निर्णय
७ मे
रात्री १२.३० वा. ४६ व्या बैठकीत प्लॅन ए ऐवजी प्लॅन बी राबवण्याचा निर्णय
मध्यरात्री १.४७ वा.
४७ व्या बैठकीत मोहीम फत्ते झाल्याची माहिती
भारताच्या काळजावर ओरखडा ओढून दहशतवाद्यांनी महिलांचं सिंदूर पुसलं. त्यामुळेच भारतीय सेनेनं ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांना आणि त्याला आश्रय देणाऱ्या पाकला इशारा दिला आहे. जेव्हा भारताकडे कुणी डोळे वाकडे करून बघतो तेव्हा त्यांचे डोळे काढण्याची ताकद भारत ठेवतो. हाच संदेश मोदींनी घेतलेल्या ४७ गुप्त बैठकानंतरच्या ऑपरेशन सिंदूरमधून दिसून आलंय.