Beed News
Beed News  Saam Tv
महाराष्ट्र

Beed News : शेतकऱ्यांपाठोपाठ इतरांचाही संयम ढळतोय; 10 महिन्यात 461 जणांनी संपवलं जीवन

विनोद जिरे

बीड - आर्थिक विवंचना, वादविवाद, अपयश, नैराश्य, व्यसनाधीनतेसह इतर क्षुल्लक कारणांवरून थेट आत्महत्येचे पाऊल उचलण्याची मानसिकता वाढू लागली आहे. यामुळं शेतकऱ्यांपाठोपाठ इतरांचाही संयम ढळत असल्याचं समोर आलंय. बीड (Beed) जिल्ह्यात जानेवारी 2022 ते ऑक्टोबर 2022 या दहा महिन्यांत 461 जणांनी आपलं जीवन संपविल्याची धक्कादायक माहिती आहे. यात पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, तणावरहित जीवनशैलीतून नैराश्येवर मात करणे शक्य असून, त्यासाठी हिंमत व संयम हवा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मराठवाड्यात बीडमध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासोबतच विविध वयोगटातील स्त्री- पुरुष अगदी क्षुल्लक कारणावरून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसत आहे. नैराश्येकडे झुकलेली व्यक्ती आपल्या जिवाचे बरेवाईट करून घेणार आहे, याची कधी-कधी जवळच्यांनाही कल्पना नसते. मात्र, चेहऱ्यावरील हास्यामागेदेखील वेदना असू शकतात, याचा प्रत्यय जिल्ह्यातील काही आत्महत्येच्या घटनांनी आला आहे. यामुळे स्वतःचा जीव देऊन सुटका करून घेण्यापेक्षा आलेल्या संकटांचा धैर्याने सामना करणे हिताचे आहे.

कोणत्या महिन्यात किती आत्महत्या झाल्या ?

जानेवारी - 40

फेब्रुवारी - 59

मार्च - 28

एप्रिल - 49

मे - 65

जून - 59

जुलै - 28

ऑगस्ट - 45

सप्टेंबर - 33

ऑक्टोबर - 55

हे बीड जिल्ह्यातील आत्महत्येचं भेसूर वास्तव आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा पश्चिम महाराष्ट्रात धडाका

Sharad Pawar Speech : इथून पुढे मातीची कुस्ती कमी होईल, मॅटवरचा सराव हवा; शरद पवारांचा राज्यातील कुस्तीपटुंना सल्ला

Dinner: रात्री जेवण केले नाही तर काय होईल?

MI vs DC : कर्णधार हार्दिक पुन्हा अपयशी; दिल्लीने १० धावांनी सामना घातला खिश्यात

Maharashtra Politics: प्रणिती शिंदेंविरोधात भाजपने निवडणूक आयुक्तांकडे दाखल केली तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT