Latur Crime Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

Latur Crime News : लातूरमधील नामांकित शैक्षणिक संस्थेत ४ अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार. प्रशिक्षकावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Alisha Khedekar

  • लातूरमधील शैक्षणिक संस्थेत ४ विद्यार्थीनींचा लैंगिक छळ

  • इंटरनॅशनल स्पर्धेचे आमिष दाखवत गैरवर्तनाचा आरोप

  • प्रशिक्षकावर POCSO अंतर्गत तातडीची कारवाई

  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरील चिंता वाढली

शिक्षणाची पंढरी आणि 'लातूर पॅटर्न'च शहर म्हणून ओळख असलेल्या लातूर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नामांकित शिक्षण संस्थेच्या मैदानावर गेली अकरा महिन्यापासून ४ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे या मुलींना इंटरनॅशनल पातळीवरील स्पर्धेत खेळण्याची संधी देतो म्हणून त्यांचा लैंगिक छळ केला असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नामंकित शैक्षणीक संस्थेच्या विद्यार्थीनी दरवर्षी वेगवेगळ्या खेळाची प्रॅक्टीस करतात. त्या-त्या खेळाच्या वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धा देखील होतात. अशा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक खेळाडुंची अपेक्षा असते. सदर नामांकित संस्थेतील विद्यार्थीनी सॉफ्टबॉल खेळाचा सराव केला. हा सराव गेले १० ते ११ महिने त्या करत होत्या.

या सरावादरम्यान या नामांकित संस्थेतील प्रशिक्षक सराव करणाऱ्या अल्पवयीन मुलीशी जवळीकता साधण्याचे प्रयत्न करायचा, नको त्या ठिकाणी स्पर्श करायचा, बोलता-बोलता अश्लील शब्दाचा वापर करायचा, त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा, त्यांच्या अंगा खांद्यावर हात ठेवणे, असा प्रकार करायचा. संतापजनक म्हणजे त्या विद्यार्थीनींचे चुंबन देखील घ्यायचा.

"मी तुम्हाला इंटरनॅशनल पातळीवरील स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध करून देतो, त्या बदल्यात तुम्ही मला हवं ते द्या" असं म्हणतं हा नराधम प्रशिक्षक मुलींचा लैंगिक छळ करायचा. त्याचा हा प्रकार मुलींच्या लक्षात येताच आरोपी प्रशिक्षकाच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी देखील तात्काळ त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT