adhik mahina, pandharpur, kamla ekadashi 2023 saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: कमला एकादशी निमित्त 4 लाख भाविक पंढरीत, दर्शनासाठी लागताेय 6 तासांचा वेळ

Aadhik Mahina : भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून पुढील दाेन दिवस विठूरायाची पाद्य पूजा बंद आहे.

भारत नागणे

Kamla Ekadashi 2023 : अधिक मासातील (adhik mahina) आज (शनिवार) कमला एकादशीचा (kamla ekadashi 2023) दिवस आहे. या निमित्त विठू नामाच्या गजरात आजही लाखाे भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांची काेणतीही गैरसाेय हाेऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. (Maharashtra News)

अधिक मासातील कमला एकादशीच्या निमित्ताने यापुर्वी पंंढरपुरात जवळपास अडीच लाखाहून अधिक भाविक आले हाेते. आजही सुमारे चार लाख भाविकांची उपस्थित पंढरीत आहे. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्राश़ेड पर्यंत गेली आहे.

भाविकांच्या (devotees) गर्दीने सहा पत्राशेड भरले आहेत. दर्शन रांगेत 15 ते 20 हजार भाविक उभे आहेत. दर्शनासाठी पाच ते सहा तासांचा अवधी लागत आहे. दर्शन रांगेतील भाविकांसाठी मंदिर समितीने चहा, पाणी, नाष्टयाची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे.

आज एकादशीच्या निमित्ताने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT