Aurangabad: शरणापूर शिवारातील धक्कादायक घटना! शेततळ्यात बुडून 3 मुलांचा मृत्यू
Aurangabad: शरणापूर शिवारातील धक्कादायक घटना! शेततळ्यात बुडून 3 मुलांचा मृत्यू Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad: शरणापूर शिवारातील धक्कादायक घटना! शेततळ्यात बुडून 3 मुलांचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबादः जिल्ह्यामध्ये शरणापूर शिवार परिसरात पोहण्याकरिता गेलेल्या ३ मुलांचा पाण्यात बुडून (Three children) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शरणापूर परिसरावर शोककळा पसरली आहे. आज दुपारी अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी या तिघांचे देखील मृतदेह बाहेर काढले आहेत. यावेळी अवघा गाव गोळा झाला होता. काही वेळा अगोदर पोहण्यासाठी गेलेल्या या मुलांचा एवढ्या दुर्दैवी अंत (Aurangabad) होईल, अशी कल्पना देखील कुणी केली नव्हती.

हे देखील पहा-

मात्र, पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला, असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याविषयी प्रकरणाविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शरणापूर (Sharanapur) शिवारात भांगसी गड पायथ्याशी नारायण वाघमारे यांचे शेततळे आहे. या तळ्यावर सायकलवर फिरण्याकरिता ही मुले गेली होती. तळ्यावर पोहोचल्यावर ते पोहण्याकरिता पाण्यात उतरले होते. मात्र, पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने या तिघांचाही बुडून मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्या मुलांची नावे प्रतिक आनंद भिसे (वय- 15), तिरुपती मारोती इंदलकर (वय- 15) आणि शिवराज संजय पवार (वय- 17) असे मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत. सकाळी शेततळ्यावर फिरण्याकरिता गेलेल्या मुलांचा या पद्धतीने दुर्दैवी अंत होईल, याची कल्पना देखील कुणी केली नव्हती. मात्र, शिवारात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अग्निशामक दलाने या मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, यानंतर अवघा गाव सुन्न झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: या वर्षी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटही कडू; ४ विकेट राखून हैदराबादचा विजय,Points Table मध्ये राजस्थानची घसरण

Benifits of Cereals: डाळ खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Tanvi Mundle : मराठी अभिनेत्रीचा बीचवर बिंधास्त फोटोशूट

Nana Patole On Opposition | एकेएक सगळेच विषय, नाना पटोलेंचा घणाघात!

SCROLL FOR NEXT