Latur Corona News Saam TV
महाराष्ट्र

Latur : लातूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; 29 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Latur Corona Updates : गुरुवारी सर्वात जास्त म्हणजे 29 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने लातूरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर: लातूर (Latur) जिल्ह्यात मागील काही महिन्यांपूर्वी कमी झालेल्या कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढायला जून महिन्यापासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने मोठा हादरा दिला असून जिल्ह्यात गुरुवारी सर्वात जास्त म्हणजे 29 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने लातूरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latur Corona Updates)

हे देखील पाहा -

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख पाहून गुरुवारी आरोग्य प्रशासनाने कोरोनाच्या चाचण्याही वाढवल्या आहेत. आरोग्य प्रशासनाने एकूण 899 चाचण्या केल्या असून यामध्ये 29 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. लातूर जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या 354 चाचण्या केल्या, यामध्ये एकूण 19 पॉझिटिव रुग्ण आढळले आहेत. तर रॅपिड अँटीजनच्या 545 चाचण्या केल्या, यामध्ये 10 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. गुरुवारी एकूण 899 चाचण्या केल्या असून यामध्ये एकूण 29 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. लातूर जिल्ह्याचा कोरोनीचा पॉझिटिव्ह रेट 3.2 टक्क्यांवर आला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT