Omicron Varien Saam Tv
महाराष्ट्र

Omicron : महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी बातमी! मुंबईत नवे २७ तर राज्यात आढळले ३१ रुग्ण!

राज्यात ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्येत आज नव्या ३१ रुग्णांची भर पडली असून मुंबईत नवे २७ रुग्ण आढळले आहेत. तर आज एकूण रुग्णसंख्या १४१ वर गेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यात ओमायक्रॉन (Omicron) रुग्णवाढीचा वेग वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात एकूण ३१ नवे ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत.

या ३१ रुग्णांपैकी २७ रुग्ण फक्त मुंबईत आढळून आले आहेत. पुणे ग्रामीण व अकोला ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

तर मुंबईमध्ये एकूण ओमीक्रोन बाधितांची संख्या (राज्यात सर्वाधिक) ७३ एवढी झाली आहे.

त्यापाठोपाठ पुणे ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्रातील ओमीक्रोन बाधितांची संख्या २२ वर पोहचली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १९ रुग्ण आहेत.

सातारा जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यात ओमीक्रोन बाधितांची संख्या प्रत्येकी ५ वर पोहचली आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३ रुग्ण आहेत.

कल्याण-डोंबिवली, नागपूर व औरंगाबाद शहरात प्रत्येकी २ रुग्ण आहेत.

बुलढाणा, लातूर, अहमदनगर, अकोला जिल्ह्यांसह वसई विरार, नवी मुंबई व मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात प्रत्येकी १ रुग्ण ओमीक्रॉन बाधित आहे.

राज्यातील नव्या ३१ रुग्णांसह राज्याची ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णसंख्या १४१ वर पोहचली आहे. आजवर ६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुती फुटली, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? दोन्ही NCP आवळणार भाजपविरोधात वज्रमूठ?

Solapur Municipal Corporation: निवडणूक आरक्षण जाहीर; दिग्गजांना धक्का,आरक्षणामुळे वाढल्या अडचणी

Skin Care: वारंवार चेहरा स्वच्छ करण्यासाठी वेट वाइप्स वापरणं आहे धोकादायक, होऊ शकतात 'हे' परिणाम

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यातील वाढत्या बिबट्यांचा कहर, अतिसंवेदनशील गांवामध्ये एआय प्रणाली

Wednesday Horoscope: धनाची तंगी दूर होणार, ५ राशींसाठी बुधवार लाभाचा; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT