Maharashtra Corona Update Saam Tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत घट, मुंबईलाही किंचित दिलासा, पण....; आजची आकडेवारी पाहाच

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत (corona new patients) मोठी वाढ होत आहे. काल रविवारी राज्यात नव्या रुग्णसंख्येनं चार हजारांचा टप्पा पार केला होता. परंतु, आज सोमवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी चिंता कायम आहे. महाराष्ट्रात (Maharashtra corona update) आज २३५४ कोरोनाच्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा एकूण आकडा २४६१३ वर गेला आहे. तर आज दिवसभरात कोरोनाच्या दोन रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला असून कोरोना मृतांची एकूण संख्या 1,47,888.वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात कोरोनाच्या १४८५ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७,६५,६०२ एवढी झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७.८३ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, मुंबईतही आज कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. कालच्या आकडेवारीच्या तुलनेत आजच्या रुग्णसंख्येत घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

परंतु कोरोनाचा धोका अजून टळलेला नाहीय. मुंबईत आज दिवसभरात १३१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तसेच आज कोरोनाचे १११६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईतील बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या १०६२२८० वर गेली आहे. तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच मुंबईत १४०८९ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ३७४ दिवसांवर पोहोचला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

SCROLL FOR NEXT