Satara News Saam tv
महाराष्ट्र

Satara News: सोशल मीडियावर स्वत:ला श्रद्धांजली वाहून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल;परिसरात खळबळ

Satara Crime News: मोबाईल स्टेटसवर स्वत:च्या फोटोला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून जीवन संपवल्याची घटना घडली

संभाजी थोरात

Satara Crime News: साताऱ्यातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. २२ वर्षीय तरुणाने मोबाईल स्टेटसवर स्वत:च्या फोटोला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील करपेवाडी येथे ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल स्टेटसवर स्वतःचा फोटो व त्यावर भावपूर्ण श्रद्धांजली आणि इतर मजकूर लिहित युवकाने राहत्या घरात जीवन संपविल्याची घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील करपेवाडी येथे काल रात्री घडली.

स्वप्नील उर्फ बंटी दिनेश करपे (वय २२) असे संबधिताचे नाव आहे. मोबाईलवरील स्टेटस पाहताच काही जणांनी तातडीने स्वप्नीलच्या घरी धाव घेतली. मात्र तत्पूर्वीच त्याने जीवन संपविले. येथील पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

कोल्हापुरात उद्योगपतीनं संपवलं जीवन

कोल्हापुरातील गडहिंग्लज शहरातील उद्योगपती संतोष शिंदे यांनी आपल्या पत्नी व मुलासह आज राहत्या घरी जीवन संपवल्‍याची घटना घडली. शुक्रवारी रात्री त्यांनी राहत्या घरी पत्नी मुलासह जीवन संपवले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर अत्याचाराचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपांमध्ये ते जवळपास महिनाभर तुरुंगात होते.

आज सकाळी त्यांनी आपल्या पत्नी व मुलासह जीवन संपविल्याची घटना घडली. संतोष शिंदे यांनी अर्जुन उद्योग समूहाची स्थापना केली होती. या अंतर्गत तेल उत्पादन, व्यायाम शाळा, बेकरी उत्पादने यासह विविध प्रकारची उत्पादने तसेच महाराष्ट्रासह मुंबई, कर्नाटकामध्येही त्यांनी उद्योग विस्तारला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्क्कादायक! बहिणीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, अपहरण केलं अन्...

Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: धरण भरलं, पण जळगाव तहानलेलंच! हतनूरचं लाखो लिटर पाणी समुद्रात

DA Hike: सरकारी कर्मचारी अन् पेन्शनधारकांची लॉटरी! महागाई भत्त्यात मोठी वाढ; पाहा किती वाढणार पगार?

Moving car safety: धावत्या गाडीत सीट बदलणं का धोकादायक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT